Mumbai Goa Expressway News Travelling To Konkan Will Have A Pleasant Journey Before Ganeshotsav Said Minister Ravindra Chavan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Goa Highway: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. आज, शुक्रवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी करत कामांचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान पळस्पे फाटा, वाखण, इंदापूर-कासू रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर  मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्या पूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल तर डिसेंबर 2023 अखेर पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्त्याच्या कामात असणारे सर्व अडथळे लवकरात लवकर सोडवून हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. तर झारप येथे दौऱ्याची सांगता झाली. भर पावसात अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्री चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मागील वर्षभरात विकासाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागत आहेत. मंत्री चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

गेली अनेक वर्ष मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये विविध कारणांमुळे अडचणी येत होत्या. पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर्स आता नव्याने आलेले कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी वर्ग या सगळ्यांचा समन्वय घडवून ते काम केल जात असल्याचे त्यांनी म्हटले. 

गणेशोत्सवाच्या आधी एक मार्गिका कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असून ही सिंगल लेन 100 टक्के पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले. शासन अतिशय वेगळ्या पद्धतीने सर्व प्रयत्न करून हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यामधला असणारा 42 किमी पहिला सिंगेललेन सुस्थितीमध्ये आहे. 12 किमीमधील सिंगल लेनचे व्हाईट टॉपिंग झालेले आहे. उरलेलं काम गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल, अशी खात्री कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी देत असल्याचे त्यांनी सांगितले. उरलेला कासूपासून 42 किमीचा रस्ता खराब अवस्थेत आहे. सिटीबीटी अशी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या मशीनच्याद्वारे खालचा बेस संपूर्ण काढण्याचं काम होतं आणि त्यातून पुन्हा चांगल्या पद्धतीने ते काम परत केलं जातं. सध्या दोन मशीन त्यांच्या उपलब्ध आहेत. अजून 8-10 मशीन घेऊन 42 किमीच्या उरलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी महामार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये वडखळ ते नागोठणे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले.

कशेडी घाटातील भुयारी मार्ग लवकर सुरू होणार

मंत्री चव्हाण यांनी भविष्यात कोकणातील एक्सप्रेस वे म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या  पोलादपूर ते खेडला जोडणाऱ्या कशेडी घाटातील 9 किमी अंतरावरील 1800 मीटरच्या भुयारी मार्गाची पाहणी केली.गणेशोत्सवात मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा  वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts