Yashasvi Jaiswal Fell Just Seven Runs Short To Break Rohit Sharma’s Big Record ; यशस्वी सामनावीर ठरला पण रोहितचा विक्रम मोडायला फक्त सात धावा कमी पडल्या, पाहा काय घडलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : यशस्वी जैस्वालने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. यशस्वी सामनावीरही ठरला. या सामन्यात खेळत असताना यशस्वी हा रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता. पण यशस्वीला मात्र रोहिचचा हा विक्रम मोडता आला नाही.

यशस्वीने वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण करताना शतक झळकावले आणि त्याने इतिहास रचला. कारण यापूर्वी एकाही भारतीय खेळाडूकडून तसे घडले नव्हते. पण यशस्वीने मात्र एकामागून एक विक्रम मोडायला सुरुवात केली आणि यशस्वी पर्व सुरु झाले. अर्धशतक, शतक आणि दीड शतक अशी मजल तो मारत गेला. दीड शतक झाल्यावर मात्र तो थोडासा संयमी झाला. कारण त्याला द्विशतक खुणावत होते. यशस्वीने द्विशतक केले असते तर तो एक मोठा विक्रम झाला असता. पण यशस्वीला यावेळी द्विशतकाने हुलकावणी दिली. पण यावेळी यशस्वीला रोहितचा विक्रम मोडता आला असता, पण रोहितचा विक्रमही त्याला मोडता आला नाही. कारण रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला सात धावा कमी पडल्या.

रोहितनेही वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते. पण हा सामना भारतामध्ये झाला होता. इडन गार्डन्सवर आपला पहिला कसोटी सामना खेळताना रोहितनेही धडाकेबाज फटकेबाजी केली होती. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताने आपले पाच फलंदाज ८३ धावांत गमावले होते. पण रोहित अर्धशतक, शतक आणि दीड शतक अशी मजल मारत पुढे चालला होता. पण यावेळी त्याच्या खेळीला ब्रेक लागला तो १७७ धावांवर. रोहितने यावेळी २३ चौकार आणि एक षटकार लगावला होता. यशस्वी या सामन्यात १७१ धावावंर बाद झाला. जर यशस्वीने अजून सात धावा केल्या असत्या तर त्याला रोहितचा १७७ धावांचा विक्रम मोडीत काढता आला असता आणि पदार्पणाच्या सामन्यात रोहितपेक्षा जास्त धावा करता आल्या असत्या. पण यशस्वीला मात्र ही गोष्ट जमली नाही.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

यशस्वी जैस्वालने दीड शतक झळकावले खरे, पण तो रोहितच्या पुढे मात्र जाऊ शकला नाही.

[ad_2]

Related posts