Ajit Pawar And Chadrakant Patil Willing For Pune Gurdian Minister

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : अजित पवारांनी बंड केलं, त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची (Ajit Pawar ) शपथ घेतली आणि अर्थमंत्रीपदही मिळालं. याचदरम्यान आता अजित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्रीपदावर डोळा असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही तशी मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील पालकमंत्रीपदावर आता दोन दादांचा डोळा असल्याचं दिसून येत आहे.

सध्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहे. अजित पवारांच्या बंडानंतर चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री नाही तर अजित पवारांना पालकमंत्री करा अशी मागणी जोर धरत आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. त्यांना पुण्य़ातली फार माहिती नाही मात्र अजित पवार यांचा पुण्याची खडानखडा माहिती आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात अजित पवारांचा दांडगा संपर्क आहे. विकासासाठी त्यांनी यापूर्वीदेखील चांगली कामं केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा विकास अजित पवारच चांगल्या पद्धतीने करु शकतात, असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

अनेकांचा अजित पवारांना पाठिंबा

अजित पवारांच्या बंडानंतर पुण्यातील मोठा गट हा अजित पवारांच्या  पाठिशी आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटाची बैठक पार पडली या बैठकीला सगळ्या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीदेखील अजित पवारांच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली, मुळशी, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी सहकारी संस्थांपासून तर कात्रज कमिटीपर्यंत सगळ्यांचाच अजित पवारांना पाठिंबा आहे. 

भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्यापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे असते. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवारच पालकमंत्री हवेत. मात्र या मागणीला भाजपकडून विरोध होऊ शकतो. भाजपकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे भाजपकून हे पालकमंत्री पद गेलं तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुण्याचं पालकत्व कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

दादा मुख्यमंत्री व्हा; पुण्यात झळकले बॅनर्स

पालकमंत्री पदाची मागणी होत असतानाच अजित पवारांनाच मुख्यमंत्री करा, अशा आशयाचे पोस्टर्सदेखील झळकू लागले आहे. पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे अजित दादा तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोलनाक्यावर 15/250 फुटाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दादांचीच हवा असल्याचं दिसत आहे.

 

[ad_2]

Related posts