Surya Gochar 2023 : कर्क राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर, ‘या’ राशींवर कोसळणार आर्थिक संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Surya gochar 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव कर्क राशीत आल्यामुळे पुढील एक महिना 12 राशींवरही त्यांचा परिणाम दिसून येणार आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन असेल तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर 17 ऑगस्टपर्यंत कोणत्या लोकांना काळजी घ्यायची गरज आहे ते पाहूयात. (surya gochar 2023 sun transit in cancer these zodiacs sign will face big money loss)

‘या’ राशींनी महिनाभर राहवं सतर्क 

वृषभ (Taurus)

सूर्य गोचरमुळे या राशीच्या लोकांना अतिशय काळजीपूर्वक राहवं लागणार आहे. त्यांना प्रत्येक कामात सतर्क राहावं लागणार आहे. या काळात तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या महिन्यांभरात तुमचं उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. अगदी अनपेक्षित ठिकाणीही तुमचा पैसा खर्च होणार आहे. करिअरच्या बाबतीतही तुम्हाला चढ उतारांचा सामान करावा लागणार आहे. कुठल्याही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करुन घ्या. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या काळात तुमच्या वाणीवरही संयम ठेवा, नाही तर होणारी कामंही रखडतील. 

वृश्चिक (Scorpio)

सूर्य गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक संकट घेऊन आला आहे. तुमच्या वडिलांसोबतच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होईल. आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतील. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या त्रासामुळे ती बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ नाही. घर आणि करिअर दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असणार आहे. जोडीदाराशी जुन्या गोष्टींवरून वादविवाद होतील. आर्थिक गणित या काळात बिघडेल. हा महिन्याभर तुम्हाला अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. 

धनु (Sagittarius)

सूर्य गोचरमुळे धनु राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उत्पन्नापेक्षा मोठ्या प्रमाणात तुमचा खर्च होणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील सदस्यावर आजारपणाचं संकट कोसळणार आहे. त्यामुळे तुमची धावपळ होणार आहे. तुमच्या मान सन्मानालाही या काळात धक्का पोहोचू शकतो. घरात किंवा शेजाऱ्यांशी तुमचं भांडण होण्याची दाट शक्यता आहे. मोठा निर्णय घेताना विचार करा अन्यथा मोठा फटका बसेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमधील राजकारणापासून दूर रहा. 

मकर (Capricorn)

सूर्य गोचर हे मकर राशीच्या लोकांसाठी संकट घेऊन आला आहे. भागीदारीच्या व्यवसात मोठं नुकसान होणार आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा एक महिना अतिशय कठीण असणार आहे. वैवाहिक जीवनही या महिन्याभरात गडबडणार आहे. कामाच्या ताण वाढणार आहे. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती ढासळू शकते. विरोध तुमच्याविरोधात मोठं षडयंत्र रचणार आहे. तुमचं आर्थिक गणित बिघडणार आहे. 

 

 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts