ईस्टर्न एक्सप्रेस वे वर नवी सुविधा, सरकत्या जिन्यासह पादचारी पूल सेवेत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव येथे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज सर्कल या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे पूर्व-पश्चिम रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा उपयोग होईल. ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असे सरकते जिने (एस्केलेटर) असणारा मुंबईतील हा पहिला पादचारी पूल आहे.

राज्य सरकारने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंडया आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत.

मुंबईतील नागरिकांना तसेच ज्येष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळे मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधण्याची माटुंगा एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने व सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रुंदीचा हा पूल आहे.

दरदिवशी किमान सात हजार ते आठ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोना काळातील लाॅकडाऊन, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.


[ad_2]

Related posts