Weekly Horoscope 17 to 23 July 2023 Some may take care of their health others may get a salary increase

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope Weekly (17 July to 23 July 2023): येत्या 17 जुलैपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासाठी काही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तर काहींनी घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असणार आहात. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे जी तुमच्यासाठी फायदेशीर असेल. 

वृषभ (Taurus)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यात कुटुंबातील वातावरण चांगले राहील. तुमचा सन्मान वाढेल आणि कुटुंबाच्या हितासाठी तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. कुटुंबात शुभ कार्य होतील, कुटुंबात परस्पर सौहार्द दिसून येईल. अध्यात्माकडे मनाचा कल राहील.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. तुमचे विचार केलेले काम पूर्ण होणार आहे. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कुटुंबासोबतचा तुमचा हा सहवास येणाऱ्या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पत्नी आणि मुलांशी सुरू असलेले मतभेद मिटतील. 

कर्क (Cancer)

हा आठवडा कष्टाचा असू शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ राहू शकता. कुटुंबात अचानक घडलेल्या कोणत्याही घटनेमुळे संपूर्ण कुटुंबातील वातावरण अस्वस्थ होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या मतांशी सहमत नसतील. मतभेदांची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

सिंह (Leo)

हा आठवडा तुमच्यासाठी खूप मेहनतीचा असणार आहे.  कुटुंबातील तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने तुमचे मन दुखावलं जाईल. बोलण्यावर संयम ठेवा. वादविवादापासून दूर राहा. या आठवड्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहणार आहे. काही समस्यांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. हा आठवडा काही समस्यांनी भरलेला असणार आहे. जुना वाद निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे मन चिंताग्रस्त होईल. पत्नीचे कुटुंबाशी वाद होऊ शकतात. 

तूळ (Libra)

हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. जुने अडकलेले पैसे परत मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल. कुटुंबातील सर्वजण तुमचा आदर करतील. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला विशेष स्थान मिळू शकते. 

वृश्चिक (Scorpio)

या आठवड्यात तुम्ही वादात अडकू शकता. विरोधक तुमचे नुकसान करू शकतात. कुटुंबातील काही लोकांच्या प्रयत्नाने परस्पर मतभेद निर्माण होतील. तुमच्या कुटुंबाचे महत्त्व समजून घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

धनु (Sagittarius)

हा आठवडा तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असणार आहे. काही कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. मालमत्तेबाबत कुटुंबात वाद-विवाद किंवा भांडणाच्या परिस्थितीमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. 

मकर (Capricorn)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला फायदा जाणवणार आहे. अध्यात्माकडे मनाचा कल राहील. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. पत्नीपासूनचे वैर दूर होतील. 

कुंभ (Aquarius)

हा आठवडा तुमच्यासाठी चागंला राहील. विचारपूर्वक केलेली कामं पूर्ण होतील. तुमचं मन प्रसन्न राहील आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. 

मीन (Pisces)

या आठवड्यात तुम्ही कोणत्याही वादात किंवा भांडणात अडकू शकता. बोलण्यावर संयम ठेवा. कोणाचीही दिशाभूल करू नका. कुटुंबात सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts