Pune News Trekker Dies Of Cardiac Arrest During Maval To Bhimashankar Trek

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News : पुण्यातील मावळ ते भीमाशंकर ट्रेक दरम्यान ट्रेकरला (Trekker) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. सहकाऱ्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण ते अयशस्वी ठरले. पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) हे ट्रेकर असून रमेश पाटील असं त्यांचं नाव होतं. ही दुर्दैवी घटना रविवारी (16 जुलै) घडली. पुण्यातील ट्रेकर ग्रुपने मावळ ते भीमाशंकर या ट्रेकचे आयोजन केले होते. त्यात रमेश पाटील ही सहभागी झाले होते. 

अचानक चक्कर आली आणि जमिनीवर कोसळले

रविवारच्या सकाळी पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक इथून ट्रेकची सुरुवात झाली. हिरवंगार अरण्य, दाट धुके अन् अधूनमधून दिसणारे फेसळणारे धबधबे हे अनुभवत ट्रेकर्सनी भीमाशंकरकडे आगेकूच केली. काही तास निसर्गाचा आनंद घेत हा रमेश पाटील यांचा ग्रुप खेड तालुक्यातील गुप्त भीमाशंकर इथे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोहोचला. मात्र त्याच परिसरात रमेश पाटलांना अचानक चक्कर आली अन् ते जमिनीवर कोसळले. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पाटलांना सर्वांनी उठवण्याचा प्रयत्न ही केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची काही हालचाल होत नव्हती, श्वास ही थांबलेल्या स्थितीत होता. काही जणांनी त्यांना त्यावेळी तोंडावाटे श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. 108 नंबरला फोन करुन रुग्णवाहिका बोलवण्यात आली पण उशीर होत होता. हे पाहून सर्वांनी रमेश पाटील यांना उचलून भीमाशंकर मंदिराजवळ आणले. 

ग्रामीण रुग्णालयात हलवलं पण तोपर्यंत…

या घटनेची माहिती घोडेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ त्यांना तळेघर येथे ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र रमेश पाटलांकडून कोणत्याही प्रसाद मिळत नव्हता, त्यामुळे तिथून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता उशीर झाला होता.  तोपर्यंतरमेश पाटलांची प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा

Pune News :  खंडाळ्यात ट्रेकिंगसाठी गेला, 200 फूट खोल दरीत कोसळला अन् रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने बचावला; नेमकं काय घडलं?

 

[ad_2]

Related posts