Kedarnath Temple Mobile Phone Use Ban Photography Banned Uttarakhand Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kedarnath Temple Mobile Ban : पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. काही दिवसापूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडीओ बनवण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. 

केदारनाथ मंदिरामध्ये मोबाईल बंदी

केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत. यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे. 

फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यास मनाई

केदारनाथ हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आयुष्यात किमान एकदा तरी येथे जाण्याची अनेकांची इच्छा असते. पवित्र केदारनाथ धाम चारधामपैकी एक महत्त्वाचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर केदारनाथचे व्हिडीओ, रिल्स आणि फोटो प्रचंड व्हायरल  झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावरही बंदी

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत होती. हा व्हिडीओ समोर आल्यावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, भाविकांसह नेटकऱ्यांना याचा तीव्र निषेध केला. मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये आली. यानंतर आधी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घालण्यात आली. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक आदेश जारी केला, यानुसार मंदिर प्रशासनाकडून धाममध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत मोबाईल बंदी लागू केली आहे.

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts