Team India Big Update On Return Of Jasprit Bumrah Shreyas Iyer Prasidh Krishna And Kl Rahul Report Will Please Fan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team Players Injury Update Today : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. 20 जुलैपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन वनडे आणि पाच टी20 सामन्याची मालिका होणार आहे. काही महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघाचा भाग होऊ शकले नाहीत. पण आता या खेळाडूंच्या कमबॅकबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, प्रमुख फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. प्रसिद्ध कृष्णाही दुखापतग्रस्त असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पण या खेळाडूच्या फिटनेसबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीतून सावरले आहेत. या सर्व खेळाडूंनी सरवाला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह बेंगलोरमधील एनसीएमध्ये दररोज 10 षटके गोलंदाजी करत आहे. तो आगामी आयरलँड दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करु शकतो. 

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि मिडिल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी उपलब्ध असतील. यांच्या फिटनेसमध्ये चांगली सुधारणा आहे. हे सर्व खेळाडू सध्या एनसीएमध्ये घाम गाळत आहेत. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या सरावाचे फोटो आणि व्हिडीओही गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

रिपोर्ट्सनुसार, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फलंदाजीचा सराव सुरु केला आहे. आयपीएल 2023 दरम्यान आरसीबीविरोधात राहुल दुखापतग्रस्त झाला होता. श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्ण आयपीएलआधी दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी आयपीएलमधून माघार घेतली होती. जसप्रीत बुमराह मागील सहा ते सात महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. आता हे सरव कमबॅकसाठी तयार झाले आहेत. 

आयरलँड दौऱ्यात बुमराह आणि अय्यर पुनरागमन करणार – 

पाठदुखीमुळे जसप्रीत बुमराह मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. टी 20 विश्वचषक आणि आयपीएलमध्ये त्याने सहभाग घेतला नव्हता. तसेच श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये खेळला नव्हता. आता हे दोन्ही खेळाडू फिट झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू आयरलँड दौऱ्यातून भारतीय संघात कमबॅक करण्याची शक्यता आहे.   

आणखी वाचा :

Asia Cup : आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कोण आहे सर्वात यशस्वी कर्णधार?



[ad_2]

Related posts