Chandrayaan-3 Mission Update Second Orbit-Raising Maneuver Performed Successfully ; चांद्रयान-३ कुठे आहे? इस्रो दिले महत्त्वाचे अपडेट, उद्या दुपारी होणार आणखी एक…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण केल्यानंतर भारताच्या चांद्रयान-३ ने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. इस्रोने गेल्या शुक्रवारी म्हणजे १४ जुलै रोजी एमव्हीएम-३ एम ४ या बाहुबली रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-३ अवकाशात पोहोचवले होते. आता इस्रोने सोमवारी दुपारी या मोहिमेबद्दल एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

चांद्रयान-३ चे लोकेशन आता ४१,६०३ X २२६ ऑर्बिट येथे आहे. इस्रोने दुसरे ऑर्बिट-रेजिंग मॅनूवर यशस्वीपणे पार केले. इस्रोने दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी ही अपडेट दिली. आता चांद्रयान-३ पृथ्वीची प्रदक्षिणा करत त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाईल. उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान तिसरे ऑर्बिट-रेजिंग मॅनूवर होणार आहे.

Chandrayaan 3: उड्डाणानंतरचा सर्वात भावनिक क्षणाचा Video; आनंदआश्रू, प्रोजेक्ट डायरेक्टरना शब्द सुचेनात, चेअरमन खुर्चीवरून…
इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ हे ४२ दिवसांचा प्रवास करून चंद्रावर पोहोचणार आहे. चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३चे लँडिंग केले जाण्याची शक्यता आहे. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर रोव्हर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल आणि पुढील ३ ते ६ महिन्याच्या काळात विविध प्रयोग करेल.

भारतासाठी अभिमानाचा क्षण, चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; पाहा प्रक्षेपणाचा LIVE व्हिडिओ

जर इस्रोची ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरले. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा ७ सप्टेंबर २०२९ रोजी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या १५ वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.

भारतासाठी ऐतिहासिक दिवस; चांद्रयान ३ कडे जगाचं लक्ष, इस्रोच्या अथक मेहनतीने इतिहास रचणार

मोहिमेची उद्दिष्टे

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणे ही यामागची उद्दिष्ट्ये आहेत.

[ad_2]

Related posts