Leander Paes Has Talk On Indian Tennis Players Problems ; भारतीय टेनिससाठी पुढचा काळ कठीण असणार, लिएण्डर पेस असं नेमका काय म्हणाला जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : एका बाजूला स्पेनचा अल्काराझ २० व्या वर्षी विम्बल्डनचे जेतेपद जिंकतो, पण दुसरीकडे मात्र तसे घवघवीत यश भारतीय टेनिसमध्ये पाहायला मिळत नाही. कारण भारतीय टेनिसपटूंच्या समस्या वेगळ्याच आहे. भारतामध्ये टेनिसमधील युवा गुणवत्तेची कमतरता नाही. पण तरी भारतीय टेनिससाठी पुढचा काळ का कठीण असेल, याबाबत भारताचा माजी महान टेनिसपटू लिएण्डर पेसने आपले मत व्यक्त केले आहे.

“मला वाटते की पुढील काही वर्षे भारतीय टेनिससाठी कठीण काळ असणार आहे. कारण बहुतांशी टेनिसच्या स्पर्धा या भारताबाहेर होत असतात. या स्पर्धांसाठी तिकीटांपासून ते राहण्यापासूनचा सर्व खर्च खेळाडूंना करावा लागत आहे. हे सर्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंबाबत माझ्या मनात नक्कीच आदर आहे. पण यामध्ये भारतीय टेनिस संघटनेची काहीच भूमिका दिसत नाही. एकीकडे बीसीसीआय आहे जी संघटना सर्वात चांगले काम करत आहेत. खेळाडूंसाठी ते सर्व काही करताना दिसतात. बीसीसीआयने आयपीएल सुरु केली, जी जगातील अव्वल लीग झाली आहे. फुटबॉलसाठी रिलायन्स खर्च करताना दिसते. पण टेनिस हा एक वैयक्तिक खेळ आहे, बॅडमिंटन किंवा ट्रॅक अँड फील्ड सारखा. त्यामुळे परदेशातील स्पर्धा खेळणे हे टेनिस खेळाडूंसाठी नक्कीच सोपे नसते, असे पेसने सांगितले.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला चांगली संधी आहे, हे सांगयालाही तो विसरला नाही. पेस म्हणाला की, ” आशियाई खेळांमध्ये, पुरुष दुहेरीत आम्हाला चांगली कामगिरी करण्याची चांगली संधी आहे. आमच्याकडे दुहेरीत संघांचे अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे खेळू शकणारे काही खेळाडू आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी कसे दुहेरीचे खेळाडू निवडले जातात, हे महत्वाचे ठरणार आहे. या निवडीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.”

शाळेपासून खेळाडूंना सकस खेळांचे ज्ञान द्यायला हवे. आता काही गोष्ट बदलत आहे, पण त्या अजून बदलल्या पाहिजेत. शाळेमध्ये पीटीच्या तासाला आपण काय करतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यावेळी खेळाडूंकडून जर काही चांगल्या गोष्टी करून घेतल्या तर नक्कीच मोठा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. या मुलांना सर्व खेळांचे ज्ञान द्यायला हवे, त्यांच्या फिटनेसवर लक्ष द्यायला हवे, तरच आपल्या गुणवान युवा खेळाडू मिळू शकतील, हे सांगायलाही पेस विसरला नाही.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

विम्बल्डन अंतिम फेरीच्या निमित्ताने ऑल इंग्लंड क्लबने मुंबईत मोठ्या पडद्यावर स्पर्धेच्या अंतिम फेरींचे आयोजन केले होते. यावेळी त्याने ‘मटा’शी खास संवाद साधला. विम्लल्डनच्या अंतिम फेरीच्या सामन्यापूर्वी पेस आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय टेनिसबाबत भरभरून बोलत होता.

[ad_2]

Related posts