Nilam Gorhe Disqualification : 'मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बाजोरिया यांना अपात्र करा'

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली… सत्तानाट्यानंतर होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागलेय… अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतलाय.. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केलीये… त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.</p>

[ad_2]

Related posts