Instagram Down After Whatsapp Users Complain On Twitter Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Instagram Down: गेल्या 24 तासांमध्ये मेटाला दुसरा झटका बसला असून आता व्हॉट्सअॅपनंतर इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down) झाल्याची माहिती आहे. मेटाच्या फोटो आणि व्हडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर यूजर्सना फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करताना यूजर्सना समस्या येत असल्याच्या तक्रारी आहेत. 

इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर त्याच्या तक्रारीसाठी यूजर्सनी ट्विटरचे प्लॅटफॉर्म (Twitter) वापरल्याचं दिसून येतंय. ट्विटरवर #InstagramDown हा ट्रेन्ड सुरू आहे. इन्स्टाग्राम डाऊन कशामुळे झालं आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कंपनीच्या वतीनंही त्यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. 

डाऊन डिटेक्टरने दिली माहिती 

आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट डाऊन ट्रॅकिंगने इन्स्टाग्राम डाऊनची माहिती दिली. दुपारी 1.30 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झालं आणि त्यानंतर अनेकांनी याबाबतच्या तक्रारी केल्या. पूर्ण देशभरातील यूजर्सनी इन्स्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 

[ad_2]

Related posts