Mumbai rains central line ambarnath badlapur local stopped due to water on the tracks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत, ठाणे, कल्याण परिसरात मंगळवारी रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मात्र आता या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक  कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका  बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे.

रुळांवर पाणी साचल्याने अंबरनाथ बदलापूर लोकल थांबली असल्याचे एका ट्विटर युझरने म्हटले आहे.



[ad_2]

Related posts