Dheeraj Ghate In Pune And Shankar Jagtap In Pimpri-Chinchwad Bjp News City President

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune BJP : 2023 च्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगलंच कामाला लागल्याचं दिसत आहे. भाजपने स्थानिक पातळीवर भाकरी फिरवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षाची खांदेपालट करण्यात आली आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे (Dhiraj ghate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (shankar jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यात बदल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करुन 70 नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीकोनातून भाजपची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा कार्यकाळ संपल्याने भाजपकडून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचाबळ शहराध्यक्षचा कालावधी संपल्यानंतर शहराची धुरा आता शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुणे ग्रामीण (बारामती) शहराध्यपदी वासुदेव काळे पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांची निवड केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. 

कोण आहेत धीरज घाटे?

धीरज घाटे हे पुण्यातील सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेलेल नेते आहेत. मागील 32 वर्षांपासून ते समाजसेवेत सक्रिय आहेत. ते नगरसेवकदेखील राहिले आहेत. महापालिकेचे ते सभागृह नेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. धीरज घाटे यांचा शहरात दांडगा संपर्क आहे. महापालिकेच्या निवडणुकांच्यावेळी त्यांच्याही नावाची चांगली चर्चा रंगली होती. शिवाय पुण्यातील अनेक गणपती मंडळांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. साने गुरुजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घाटे काम करत आहेत.

कोण आहेत शंकर जगताप?

शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आहेत. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यानंतर शंकर जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आमदारपदासाठी भाजपचा खरा चेहरा म्हणून शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा होती. आता शंकर जगताप यांच्यावर शहराध्यपद सोपवण्यात आलं आहे. 

 

हेही वाचा-

Ajit Pawar : अजित पवार सत्तेत येताच पुत्र पार्थ आणि जय पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये; पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र



[ad_2]

Related posts