पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) – चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्प, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, चिंचवडमधील तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन आणि पालिकेच्या (PCMC) नवीन 13 मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन यासह 22 कामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) होणार आहे.चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाउस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, बोऱ्हाडेवाडीतील शाळेची इमारत, मोशीतील सब फायर स्टेशन, रावेतमधील उद्यान, वायसीएम रूग्णालयातील सीएसएसडी प्रकल्प, ब क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत, कृष्णानगर येथे लॉन टेनिस कोर्ट, नेहरूननगर येथील शाळेची इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुलमधील भाजी मंडईचे लोकार्पण, लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.तर, भामा-आसखेड धरणाच्या जॅकवेल, चिंचवड, ऑटो क्लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत, पिंपरीतील डेअरी फार्म पुल, मोशी, डुडुळगाव प्राथमिक शाळा इमारत, चोविसावाडीतील नवीन अग्निशामन केंद्र, घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन, (PCMC) निरामय योजनेचा प्रारंभ यासह शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर आणि काही उद्घाटने ऑनलाइन पध्दतीने होणार आहेत.
Related posts
-
पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन !
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :-pragatbharat.com कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी... -
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू
पुणे, दि. २७:(pragatbharat.com ) पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला.... -
नेहरूनगरमधील ‘लीड” तुमच्या कायम लक्षात राहील – हनुमंत भोसले
स्नेह मेळाव्यामध्ये अजित गव्हाणे यांना निवडून आणण्याचा निर्धार भोसरी, 25 ऑगस्ट :(pragatbharat.com ) – येणारा काळ वैऱ्याचा...