Agriculture News Pune File Cases In Case Of Bogus Fertilisers Seeds Minister Chandrakant Patil Instructions

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News : आगामी खरीप हंगामात (Kharif season) शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहेत. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. पुणे (Pune) जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पाटील बोलत होते.

शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज 

अल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे असे पाटील म्हणाले. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल असे पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीनं राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषी वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही  पाटील म्हणाले.

पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला आहे. त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्या, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.  मार्च 2023  अखेर कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून यावर्षात जिल्ह्यात 10 हजार वीजजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार वीजजोडासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आता वीजजोडणी द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

पुणे जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र दोन लाख हेक्टर 

मान्सूनवर परिणाम करु शकणाऱ्या अल निनो घटकाचा विचार करता जिल्ह्यात बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे 28 हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यावर्षी 33 हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी  दिली.

बाजरीची उत्पादकता वाढवण्यावर भर

यावर्षी बाजरीची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याचे नियोजन केले आहे. तसेच पावसाला विलंब झाल्यास भात पिके करपून जाण्याचा अनुभव लक्षात घेता भाताच्या रोपवाटिकांना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देण्यात येणार आहेत. अंजीराला भौगोलिक ओळख (जीआय) मानांकन मिळाले. त्याप्रमाणं आता जुन्नर परिसरातील शिवनेरी हापूसची जीआय मानांकन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून मानांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरीत करण्यात आले असून यापुढे नुकसानभरपाईची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या:

Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित : कृषीमंत्री

[ad_2]

Related posts