Pune Crime News Tobacco Businessman Fired On Road The Thief Escaped With Four Lakhs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News :  पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच (Pune Crime News) उरला नसल्याचं काही घटनांवरुन (Pune news) समोर येत आहे. भरदिवसा कोयता हल्ला आणि भरदिवसा गोळीबाराच्या (Pune Crime) घटना समोर येत आहे. आजच पुण्यात भररस्त्यात (Pune Firing) गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. दुचाकीवरुन जाणार्‍या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन जखमी केले. त्यांच्याकडील 4 लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोरील रोडवर घडला. 

स्वारगेट परिसरातील अनेकांनी रात्री हा थरार अनुभवला. लतेश हसमुखलाल सुरतवाला असं व्यावसायिकाचं नाव आहे. या घटनेत सुरतवाला हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीत आणि माडीला गोळी लागली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतेश सुरतवाला यांचा नाना पेठेत तंबाखुचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या नोकराला घेऊन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यांच्याजवळ 4 लाख रुपये असलेली बॅग होती. गणेश कला क्रीडा येथे आल्यानंतर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात त्यांच्या पाठीत व मांडीत शिरल्याने ते जागीच कोसळले. तेव्हा गोळीबार करणार्‍यांनी त्यांच्याकडील 4 लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़. 

 सीसीटीव्ही धुरकट…

ही संपूर्ण घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले होते. या संपूर्ण तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्वाचं असतं. मात्र या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज धुरकट असल्याने आरोपीचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र तरीही पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. भरदिवसा रस्त्यावर गोळीबार झाल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 

पोलिसांचा धाकच नाही…

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कहर केला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहे. मारहाण, दहशत, चोरी आणि हल्ल्यांच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पोलिसांना मारहाण केल्याच्यादेखील घटना समोर येत आहे. पोलिसांवरच गाडी घातल्याने पोलिसांनी गोळीबार केला आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का?, किंवा वर्दीची भीती उरली नाही काय़, असे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना दिसत आहे. 

हेही वाचा-

Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?

[ad_2]

Related posts