Rohit Sharma Created History In 100th Test Against West Indies ; रोहित शर्माने १०० व्या कसोटीत रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाही जमली नाही ही मोठी गोष्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन : ऐतिहासिक १०० व्या कसोटीत इतिहास रचला आहे तो भारताचा कर्णधार रोहित शर्माने. या ऐतिहासिक सामन्यात रोहितने एका मोठ्या विक्रमाला गावसणी घातली आहे. आतापर्यंत हा विक्रम कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही.

रोहितने दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज फलंदाजी केली. यावेळी अर्धशतकासह रोहितने हा विक्रम विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत केला आहे. या स्पर्धेत रोहितच्या २००० धावा पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला ही गोष्ट करता आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत २००० धावांचा पल्ला गाठणारा रोहित हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक सामन्यात हा इतिहास रचण्याची संधी रोहितला मिळाली आहे. त्यामुळे रोहित आता या सामन्यात शतक झळकावणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माला एक गुज न्यूज मिळाली होती. दुसरा ऐतिहासिक कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी आयसीसीने एक मोठी गोष्ट जाहीर केली आहे. आयसीसीने हा ऐतिहासिक सामना सुरु होण्यापूर्वी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहित शर्मा हा भारताचा असा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे की ज्याने अव्वल १० फलंदाजांच्या यादीत स्थान पटकावले आहे. रोहित शर्मा यापूर्वी १३ व्या स्थानावर होता. पण पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला या क्रमवारीत झाला आहे. रोहितने यावेळी तीन स्थानांची झेप घेतली आहे आणि तो आता आयसीसीच्या कसोटी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत आता १० व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितचे या क्रमवारीत ७५१ गुण आहेत.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत तो भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. कारण रोहितने जी गोष्ट केली आहे ती आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला करता आलेली नव्हती. रोहितने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर आता या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहितसाठी आनंदाची बातमी आली आहे.

[ad_2]

Related posts