Earthquake-news-3-earthquakes-jolt-rajasthan-jaipur-in-just-half-an-hour Marathi News | Jaipur Earthquake : जयपूरमध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन जोरदार धक्के; लोक घाबरून रस्त्यावर आले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jaipur Earthquake : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की लोकांना स्फोटक आवाज ऐकू आला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडताना दिसले. या घटनेमुळे जयपूरसह आजूबाजूच्या भागांत भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण शहर हादरले आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी जयपूर शहरात अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन वेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्याची तीव्रता तीन वेळा स्वतंत्रपणे मोजली गेली. जयपूरमध्ये पहाटे 4.25 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता अनुक्रमे 3.1, 3.4 आणि 4.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी होती. असे असले तरी सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पहिला भूकंप 4.09 मिनिटांनी झाला. त्याची तीव्रता 3.4 इतकी मोजली गेली. त्याचवेळी 4 वाजून 22 मिनिटांनी सर्वात जोरात भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर लगेच, 4 वाजून 25 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का बसला. मात्र, या तिन्ही भूकंपांच्या धक्क्यांमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की झोपलेले लोकही जागे झाले आणि घराबाहेर पळताना दिसले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक फोनवर नातेवाईकांची प्रकृती विचारताना दिसत होते. 

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करून माहिती दिली

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, जयपूरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. अशा प्रकारचं ट्वीट त्यांनी पोस्ट केलं आहे. 

मणिपूरमध्ये पहाटे भूकंप झाला 

मणिपूरमध्येही पहाटे भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मणिपूरच्या उखरुलमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. मणिपूरमध्येही या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने राजस्थानपासून मणिपूरपर्यंत पृथ्वी हादरताना दिसली. लोकांनी सोशल मीडियावर भूकंपाच्या धक्क्यांचे अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत, ज्यामध्ये भूकंपाचे भयावह दृश्य पाहायला मिळते.



[ad_2]

Related posts