Virat Kohli Created History in 500th International Match; विराट कोहलीने ५००व्या सामन्यात रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाही जमली नाही ही मोठी गोष्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गुरुवारी त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना (Virat Kohli 500 Match) खेळण्यासाठी उतरला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना (IND vs WI 2nd Test) पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. विराट पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८७ धावा करून नाबाद परतला आहे. तर जडेजा आणि कोहलीने १०० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरत २८८ वर नेऊन ठेवला. याचसोबत या ऐतिहासिक सामन्यात सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग जे करू शकले नाहीत ती कामगिरी विराटने केली आहे.

५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठी कामगिरी

विराट कोहलीने आपल्या ५००व्या सामन्यात अर्धशतक झळकावले. ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक ठोकणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत ९ क्रिकेटपटूंनी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत या ऐतिहासिक क्षणी कोणीही अर्धशतक झळकावले नव्हते. विराट कोहलीने केवळ अर्धशतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला नाही तर आता त्याला शतक झळकावून विश्वविक्रम करण्याची इच्छा आहे.

सचिन तेंडुलकरने २००६ मध्ये आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यावेळेस सचिनने ३५ धावा केल्या होत्या. ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला. आतापर्यंत ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता, ज्याने ४८ धावा केल्या होत्या. परंतु आता या दोघांनाही मागे सारत विराट कोहली अव्वल स्थानी आला आहे.

५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

विराट कोहली – ८७* (२०२३)
कुमार संगकारा – ४८ (२०१३)
रिकी पाँटिंग – ४४ (२०१०)
सचिन तेंडुलकर – ३५ (२००६)
एमएस धोनी – ३२* (२०१८)
शाहिद आफ्रिदी – २२ (२०१५)
महेला जयवर्धने – ११ (२०११)
जॅक कॅलिस – ६ (२०१२)
राहुल द्रविड – २ (२०११)
सनथ जयसूर्या – १ (२००७)

[ad_2]

Related posts