Parbhani Rain Yellow Alert Meteorological Department’s Yellow Alert In Parbhani District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Parbhani Rain Yellow Alert : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार मराठवाड्यातील परभणी (Parbhani) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनी नदी, नाल्यांना पूर आल्यावर काळजी घेणं गरजेचं आहे. 

मराठवाड्यातील परभणीसह पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसंदर्भात खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असल्यास आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल आणि पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी आणून ठेवण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.  

शिवाय आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाखाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे टाकू नका. घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. कारण हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दाभाडे यांनी कळवले आहे. 

शेतकऱ्यांना मोठा दिलासा… 

जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. काही भागात तर पेरण्या देखील झाल्या नव्हत्या. तर जिथे पेरण्या करण्यात आल्या, तिथे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र मागील तीन-चार दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पिकांना जीवनदान मिळाले असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Rain Yellow Alert : मराठवाड्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; दमदार पावसाची शक्यता

[ad_2]

Related posts