Shukra Vakri : 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार! शुक्र वक्रीमुळे घरात येणार पैशांच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shukra Vakri 2023 in kark : संपत्ती, विलास, प्रेम आणि सौंदर्याचा कारक शुक्र ग्रह रविवारी 23 जुलैला कर्क राशीत वक्री स्थितीत येणार आहे. याच महिन्याच्या 7 जुलैला शुक्र गोचर झालं. आता उद्या म्हणजे रविवारी शुक्र सिंह राशीतून कर्क राशीत संक्रमण करणार आहे.  23 जुलैला सकाळी 6.01 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करुन तिथे तो  7 ऑगस्ट 2023 पर्यंत विराजमान राहणार आहे.

शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडणार असून काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींसाठी संकट येणार आहे. त्यामुळे आज जाणून घेणार आहोत कुठल्या राशीच्या नशिबात पैशाच पैशा आहे ते पाहूयात . (shukra vakri 2023 in kark Venus go retrograde there zodiac signs get Rich)

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांचे नातेसंबंध या काळात सुंदर आणि घट्ट होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार असून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरणार आहे. तिजोरीमध्ये या काळात धनसंपदा राहणार आहे. 

वृषभ (Taurus)

शुक्र वक्रीमुळे वृषभ राशीच्या घरात आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. कामाच्या ठिकाणी प्रगती साधणार आहात. व्यवसायिकांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. मात्र काही कारणामुळे कोर्टकचेरीचे प्रकरण मागे लागू शकतं. 

मिथुन (Gemini)

शुक्र वक्रीमुळे मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमाचे दिवस सुरु होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार आहे. या काळातील प्रवास तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणार आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. घरात प्रसन्न वातावरण असेल. 

कर्क (Cancer) 

शुक्र वक्रीमुळे तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं यामुळे तुम्ही कोणाकडूनही सहज काम करुन घेणार आहात. उत्पन्नाची अनेक मार्ग तुम्हाला सापडणार आहे. 

सिंह (Leo)

शुक्र वक्रीमुळे या राशीच्या लोकांचं करिअर उंच शिखरावर असणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभणार आहे. व्यवसायिकांना मोठा लाभ होणार आहे. फक्त हट्टीपणा दूर ठेवा. प्रेम जीवनात आनंद असणार आहे. 

कन्या (Virgo)

शुक्र वक्रीमुळे कन्या राशीच्या लोकांना चांगला काळ असेल. पण ज्या लोकांचे परदेशात काम असेल त्यांना जास्त फायदा होणार आहे. अगदी परदेशात जाण्याची तुमची इच्छाही या काळात पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

तूळ (Libra)

शुक्र वक्री तूळ राशीच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आले आहेत.  रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. या काळात तुमच्या आत्मविश्वास उंचवणार आहे. व्यवसायात सामाजिक संपर्काचा फायदा या काळात तुम्हाला दिसून येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभा होईल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts