Joshua Da Silva Mother Met Virat Kohli and Got Emotional Watch Viral Video; वेस्ट इंडिजच्या खेळाडूच्या आईने विराटला भेटताच कडकडून मारली मिठी, कोहलीला भेटून अश्रू झाले अनावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs WI 2nd Test) शतक झळकावून परतलेल्या कोहलीला देखील कॅरेबियन देशात आईचे प्रेम मिळाले. विराटचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. याच चाहत्या वर्गामध्ये इंटरनॅशनल सामने खेळाच्या एका खेळाडूच्या आईचाही समावेश आहे. भारत सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज खेळाडूची आई शुक्रवारी स्टेडियममध्ये पोहोचली आणि सामन्यानंतर तिने कोहलीला भेटत घट्ट मिठी मारली आणि ती भावुकही झाली.

विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक जोशुआ दा सिल्वाची आई शुक्रवारी स्टेडियममध्ये पोहोचली होती, ज्याचा उल्लेख जोशुआने विराट कोहली मैदानावरत खेळताना केला. जोशुआने विराटला सांगितले होते की, त्याची आई विराटला भेटायला येणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आणि विराट मैदानातून टीम बसमध्ये चढणार होता, तेवढ्यात जोशुआ दा सिल्वाची आई त्याच्यासमोर उभी राहिली. विराट त्यांना भेटण्यासाठी जवळ येताच त्यांनी विराटला मिठी मारली. यादरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. जोशुआची आई विराटला सांगते की ती त्याची खूप मोठी फॅन आहे. जोशुआच्या आईने सोबत आलेल्या जोशुआच्या वडिलांना विराट आणि त्यांचा फोटो काढण्यास सांगितले, त्यानंतर विराटने त्यांच्यासोबत फोटो क्लिक केला. दरम्यान, जोशुआची आई भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूही आले.

यादरम्यान जोशुआच्या आईने विमल कुमार यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “जोशुआ माझा मुलगा आहे, मी त्याला सांगितले की मी फक्त विराटला भेटायला येत आहे, त्याला नाही. कारण मी त्याला रोज पाहते.” तो म्हणाला की, “विराट एक अद्भुत व्यक्ती आहे. विराट कोहलीला भेटणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे. माझा मुलगा त्याच्यासोबत खेळत आहे आणि मी त्याला भेटले यासाठी मी खरंच भाग्यवान आहे.”
जोशुआच्या आईने विराट कोहलीचे खूप कौतुक केले. तत्पूर्वी, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली फलंदाजी करत असताना विकेट कीपिंग करणाऱ्या जोशुआने आई विराटची किती मोठी फॅन आहे हे कोहलीला सांगितले. दरम्यान, स्टंपवरील माईकमध्ये दोन्ही खेळाडूंमधील संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले, जे सोशल मीडियावरही व्हायरल झाले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

[ad_2]

Related posts