How To Get Younger Look At Age 60 Know 2 Health Tips; ६० व्या वर्षीही दिसाल तरूण आणि आकर्षक, करा फक्त ही २ कामं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

झोपण्याची योग्य वेळ

झोपण्याची योग्य वेळ

तुम्ही रोज वेगवेगळ्या वेळी झोपत असाल आणि उठत असाल तर तुमचे आरोग्य लवकर खराब होऊ शकते. हो हे खरं आहे. रूबिकाने सांगितल्याप्रमाणे, आरोग्यासाठी केवळ योग्य झोप आवश्यक नाही तर वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणंदेखील महत्त्वाचं आहे.

झोप आपल्यासाठी वरदान असते, यामुळे मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

(वाचा – परफेक्ट फिगरसाठी मसाबा गुप्ता खाते या पदार्थाचं धिरडं, जाणून जबरदस्त फायदे)

चांगल्या झोपचे आरोग्याला फायदे

चांगल्या झोपचे आरोग्याला फायदे

योग्य वेळी झोपून सकाळी लवकर उठल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. झोपेचे फायदे जाणून तुम्हीही नियमित रूटीनमध्ये व्यवस्थित समाविष्ट केले करायला हवे. पचनक्रिया चांगली होते, शरीराचे वजन संतुलित राहण्यास मदत मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते. मात्र सतत धावपळ करत राहिल्याने आणि झोप न मिळाल्याने शरीराला त्रास होतो आणि चांगल्या झोपेचे अधिक फायदे होतात.

याशिवाय झोपणे आणि जागण्याचे रूटीन व्यवस्थित ठेवल्यास, हृदय रोगापासून दूर राहता, स्मरणशक्ती चांगली राहाते आणि डायबिटीससारख्या आजारापासून दूर राहाता येते. बद्धकोष्ठता, पोट खराब होणे अथवा जास्त थकवा येत नाही.

(वाचा – वृद्धांना उतरत्या वयात लंबर कॅनॉल स्टीनोसिसचा धोका अधिक, म्हणजे नेमका काय आहे आजार)

तरूण दिसण्यासाठी योग्य पदार्थ खा

तरूण दिसण्यासाठी योग्य पदार्थ खा

आरोग्यावर तुमचा तरूणपणा अवलंबून असतो. हेल्दी राहण्यासाठी खाण्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. तेलकट, फास्टफूड अधिक प्रमाणात खात असाल तर त्यावर वेळीच नियंत्रण ठेवा. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, खाण्याचा परिणाम हा शरीरावर होत असतो.

पचन अग्नीवर परिणाम होऊ शरीराची एनर्जी बदलते, त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. भूक न लागणे, थकवा, सुक्ती असा समस्याही निर्माण होतात. त्याशिवाय गॅस, अपचन, त्वचेतील कोरडपणा, अनिद्रा, हिरड्या कमकुवत होणे या समस्याही येतात.

(वाचा – १४२ किलोच्या दक्ष बिलवालने घटवले ८ महिन्यात २४ किलो वजन, पॉवर लिफ्टिंगमध्ये मिळवले मेडल)

तरूण राहण्यासाठी मेटाबॉलिजम महत्त्वाचे

तरूण राहण्यासाठी मेटाबॉलिजम महत्त्वाचे

६० व्या वर्षीही तरूण दिसायचे असेल तर आरोग्यासाठी मेटाबॉलिजम योग्य असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुपारी आणि रात्री जेवणाची वेळ ठरवून घ्या. याच वेळात तुम्ही जेवल्यास, अन्नपचन होण्यास आणि मेटाबॉलिजम चांगले राखण्यास मदत मिळते. अनेक आजार हे व्यवस्थित आणि वेळेवर न खाण्यामुळे होतात हे तुम्ही लक्षात ठेवायला हवे.

[ad_2]

Related posts