Farmer Suicide News If The Report Is False File Case Against Sunil Kendrekar Demand Of Sanjay Shirsat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Shirsat On Sunil Kendrekar reports : शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला असून, या आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचा एक सर्वेक्षण केला होता. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु असल्याचा अहवाल सरकार देण्यात आला आहे. दरम्यान हा ‘खळबळजनक अहवाल’ एबीपी माझाने दाखवताच याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत असून, या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले आहे.   

काय म्हणाले शिरसाट…

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिरसाट म्हणाले की, “अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर यांनी काढला आहे. त्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यावरून संताप डोक्यात गेलेला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा रिपोर्ट असेल शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्याकडे कालच याबाबत मागणी केलेली आहे. तर विभागीय आयुक्त म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का?, नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी उभा कसा राहील, याकडे लक्ष द्या, शेतकरी आत्महत्या कसे करतात याकडे तुमचे लक्ष आहे का? असे शिरसाट म्हणाले. तर तुमची राजकीय व्यक्तींसारखा स्टेटमेंट आणि अहवाल देतायत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. जर अहवाल चुकीचा असेल तर निश्चित गुन्हा दाखल केला जाईल. सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात ईडीची चौकशी चालू असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 

काय केंद्रेकरांचा अहवाल? 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबाची माहिती भरुन घेण्यात आली होती. सर्वेक्षण करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक! मराठवाड्यातील 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात; खळबळजनक अहवाल ‘एबीपी माझा’च्या हाती

[ad_2]

Related posts