sattwik-chirag enters in the semi-finals of the korea open badminton tournament ; भारताचे सात्त्विक-चिराग कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडकले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

येओसू (कोरिया) : भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने कोरिया ओपन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताकुरो होकी-युगो कोबायाशी जोडीला नमविले. भारताचे आव्हान आता केवळ सात्त्विक-चिराग जोडीवर अवलंबून आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने ताकुरो-युगो जोडीवर २१-१४, २१-१७ असा विजय मिळवला. ही लढत ४० मिनिटे चालली. जपानच्या जोडीला पाचवे मानांकन होते. सात्त्विक-चिराग जोडीचा हा ताकुरो-युगो जोडीविरुद्ध पाचव्या लढतीपैकी चौथा विजय ठरला. सात्त्विक-चिरागने गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर-१००० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतरची ही त्यांची पहिलीच स्पर्धा होती.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला थोडी चुरस बघायला मिळाली. सलग तीन गुण घेऊन जपानच्या जोडीने ४-२ अशी आघाडी घेतली होती. भारतीय जोडीनेही सलग तीन गुण घेऊन आघाडी मिळवली. पुढील गुण घेऊन जपानच्या जोडीने ५-५ अशी बरोबरी साधली. यानंतर मात्र, सात्त्विक-चिरागने ‘टॉप गिअर’ टाकला. त्यांनी ताकुरो-युगो जोडीला संधीच दिली नाही. विश्रांतीला सात्त्विक-चिराग जोडीकडे ११-५ अशी आघाडी होती. नंतर आक्रमक स्मॅशेस, नेटजवळ सुरेख खेळ या जोरावर सात्त्विक-चिरागने पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेममध्ये ताकुरो-युगो जोडीने आव्हान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे या गेममध्ये अनेक चढ-उतार बघायला मिळाले. भारतीय जोडीकडून संथ सुरुवात झाली. त्यामुळे ते सुरुवातीला ३-६ने पिछाडीवर होते. पुढे सलग सहा गुण घेऊन आघाडी १४-९ने वाढवली. ताकुरो-युगो जोडीने अद्याप हार मानली नव्हती. त्यांनी भारतीय जोडींच्या चुकांचा फायदा घेऊन १६-१६ अशी बरोबरी साधली. निर्णायक क्षणी सात्त्विक-चिराग जोडीने संयम न गमावता खेळ केला आणि गेमसह लढत जिंकली.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

सात्त्विक-चिरागची उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित चीनच्या वेइ केंग लिअँग-चांग वांग जोडीविरुद्ध लढत होईल. वेइ-चांग जोडीने २०२१च्या जागतिक स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सात्त्विक-चिराग यांनी कारकिर्दीत प्रथमच कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

[ad_2]

Related posts