गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Moscow : मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये (Moscow Shopping Mall) शनिवारी गरम पाण्याचा पाइप फुटल्याने ( Hot Water Pipe) चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. टास या वृत्तसंस्थेने महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाईप फुटल्यानंतर मॉलच्या एका भागात उकळत्या पाणी भरले होते. त्यामुळे किमान 70 लोक जखमी झाले आणि सुमारे 20 लोक अडकले. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर टासला सांगितले की या घटनेत किमान दहा जण गंभीररित्या भाजले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. व्हिडीओमध्ये पायरीजवळील भिंतीला एक छिद्र असल्याचे दिसून येत आहे. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये डॉक्टर जखमी व्यक्तीवर उपचार करत असल्याचे दिसत आहे. मॉलच्या इमारतीच्या दारातूनही गरम पाण्याची वाफ बाहेर येताना दिसत आहे. पाईप फुटल्यानंतर मॉलच्या एका भागात उकळते पाणी भरले होते. त्यामुळे लोक भाजले आले आणि संपूर्ण मॉलमध्ये आरडाओरडा सुरू झाला. व्रेमेना गोडा (द सीझन्स) या नावाने ओळखला जाणारा मॉल 2007 मध्ये सुरु झाला होता. त्यामध्ये 150 हून अधिक दुकाने आहेत.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तपास समितीच्या प्रवक्त्या युलिया इव्हानोव्हा यांनी शनिवारी सांगितले की रशियन तपास समितीच्या तपासानंतर चार लोकांच्या मृत्यूबद्दल फौजदारी खटला सुरू केला आहे. बचाव पथकाने घटनास्थळावरून चार मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच

रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला. रशियाने विविध भागात केलेल्या हवाई हल्ल्यात पूर्व युक्रेनमध्ये दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले. याशिवाय जवळपास असलेल्या कार्यालयांचेही नुकसान झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी युक्रेनियन ड्रोनने क्रिमियामधील दारूगोळा डेपोवर हल्ला करण्यात आला होता.

रशियाने शनिवारी खार्किव भागातील कुप्यान्स्क शहरावर हल्ला केला. या गोळीबारात 57 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, रशियन सैन्याने ड्वोरिचना शहरातही गोळीबार केला. तिथे एका 45 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. खार्किव प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनियन सैनिक कुप्यान्स्कच्या आसपासच्या भागात ठाण मांडून बसले आहे. शत्रूला आजतागायत पुढे येते आलेले नाही. तर दुसरीकडे युक्रेनच्या आग्नेय झापोरिझिया भागात गोळीबारात एका रशियन पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तर तीन रशियन पत्रकार जखमी झाले आहेत. 

Related posts