गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moscow : मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये (Moscow Shopping Mall) शनिवारी गरम पाण्याचा पाइप फुटल्याने ( Hot Water Pipe) चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. टास या वृत्तसंस्थेने महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाईप फुटल्यानंतर मॉलच्या एका भागात उकळत्या पाणी भरले होते. त्यामुळे किमान 70 लोक जखमी झाले आणि सुमारे 20 लोक अडकले. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर टासला सांगितले की या घटनेत किमान दहा जण गंभीररित्या भाजले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.…

Read More