Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Enters in Men’s Double Korea Open Final 2023; सात्विक-चिरागच्या जोडीची कमाल! चिनी वर्ल्ड चॅम्पियन जोडीला हरवत प्रथमच फायनलमध्ये एन्ट्री

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

येओसू (कोरिया): थॉमस कप, आशियाई अजिंक्यपद अशा बॅडमिंटनमधील आव्हानात्मक स्पर्धा जिंकणाऱ्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन दुहेरीतील जोडीने शनिवारी कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० मिनिटे रंगलेल्या उपांत्य फेरीत सात्त्विक-चिराग यांनी जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लियांग वी केंग-वँग चँग या चिनी जोडीचे आव्हान २१-१५, २४-२२ असे मोडून काढले.

बॅडमिंटनविश्वात ‘सातचि’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिराज-सात्त्विकची ही यंदाच्या मोसमातील तिसरी अंतिम फेरी आहे. जागतिक दुहेरीच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सात्त्विक-चिरागने यंदा स्विस ओपन सुपर ३०० (मोसमाच्या पूर्वार्धात) आणि इंडोनेशियन ओपन सुपर १००० या स्पर्धा (गेल्या महिन्यात) जिंकल्या आहेत.

पहिल्या गेममध्ये ७-७ अशा गुणांपर्यंत प्रतिस्पर्ध्यांत बरोबरी होती. नंतर मात्र सात्त्विक-चिरागने आघाडी घेत १४-८ असे वर्चस्व निर्माण केले. अन् पुढे हा गेम २१-१५ असा खिशात टाकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीपासून चढाओढ दिसली. सात्त्विक-चिरागने १२-८ अशी आघाडीही घेतली. मात्र लियांग वी केंग-वँग चँग हे सहज हार माणारे नव्हते. त्यांनी सात्त्विक-चिराग यांना १८-१८ असे गाठले. सामन्यातील रंगत वाढत असताना प्रतिस्पर्ध्यांकडून चुकाही झाल्या. सात्त्विक-चिराग यांनी आपल्याच सर्व्हिसवर दोनवेळा टाळता येण्याजोग्या चुका केल्या. मध्येच सर्व्हिसही तोकडी पडत होती. सात्त्विक-चिरागला तीन ‘मॅच पॉइंट’ही लाभले, पण तेही गमावले. अखेर लक्षकेंद्रित करत सात्त्विक-चिरागने गुणांची कमाई करत दुसरा गेम आणि लढत जिंकली.

आणखी एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारता आल्याने छान वाटते आहे. सिंगापूर स्पर्धेत आमच्यावर पहिल्याच फेरीत गारद होण्याची नामुष्की आली होती. त्यानंतर. या स्पर्धेत भाग घेताना, शंभर टक्के योगदान द्यायचे एवढेच मनात होते. जय, पराजय हा खेळाचा भागच असतो; पण सर्वोत्तम कामगिरीच केली नाही, या भावनेने सामन्यातून बाहेर पडायचे नव्हते. शनिवारी शटलचा वेग खूप होता. त्यामुळे ते फार वर उसळणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली -चिराग शेट्टी

कोण आहे सात्विकसाईराज? शोएब अख्तरपेक्षा तिप्पट वेग अन् थेट गिनीज बुकमध्ये झाली नोंद
खेळ आकड्यांचा

१. सात्त्विक-चिराग यांनी कारकिर्दीत प्रथमच केंग-वाँग या चिनी (जागतिक रैंकिंग २) जोडीवर विजय मिळवला. याआधीच्या दोन्ही लढतींत सात्त्विक-चिराग यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा मार्चमध्ये ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतही या दोघांविरुद्ध सात्त्विक-चिरागचा पराभव झाला होता.
२. कोरिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची सात्त्विक-चिरागची ही पहिलीच खेप

दृष्टिक्षेप

  • सात्त्विक-चिराग यांचे उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी केंग-चँग यांनी यंदा थायलंड आणि इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे
  • छोट्या रॅलिजमध्ये एकमेकांना गुंतवून गुण पटकावण्याचे डावपेच प्रतिस्पर्ध्यांनी आखले होते
  • सात्त्विकचे जोरदास स्मॅशेस या सामन्यातही बघायला मिळाले
  • ‘बॅकलाइन’च्या सदोष अंदाजामुळे भारतीय जोडीला काही गुण गमवावे लागले
  • समन्वय ही सात्त्विक-चिराग यांच्या खेळातील जमेची बाजू, दोघांपैकी कुणी, कधी पुढाकार घ्यायचा याची समज त्यांना आहे

[ad_2]

Related posts