निर्णायक सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव; टीम इंडियाचा कर्णधार म्हणाला-आमचे फलंदाज खराब…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो: गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर निराशा केल्याने भारत ‘अ’ संघाला आशिया कप उद्योन्मुख वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पाकिस्तान ‘अ’ संघाकडून १२८ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने साखळीत एकतर्फी लढतीत पाकिस्तान संघाला पराभूत केले होते, पण अंतिम फेरीत भारतीय संघाने नांगी टाकली.

आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रविवारी ही अंतिम लढत झाली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. पाकच्या सैम अयुब-साहिबझादा फरहान यांनी १२१ धावांची सलामी दिली. यानंतर भारताने पाकची ५ बाद १८७ अशी स्थिती केली होती. मात्र, तय्यब ताहीरने तळाच्या फलंदाजांच्या साथीत पाकिस्तानला भक्कम धावसंख्या उभारुन दिली.

पाकिस्तानने ८ बाद ३५२ धावा करीत भारतीयांवर दडपण आणले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ४० षटकांत २२४ धावांत आटोपला. भारताकडून केवळ अभिषेक शर्माला अर्धशतक ठोकता आले. इतर फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. भारताची सुरुवात चांगली होती, पण साई सुदर्शन बाद झाल्यावर भारतीय फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. यश धुल आणि अभिषेक शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी मधल्या आणि तळाच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. पाकिस्तानचे फलंदाज ३२ चौकार आणि १३ षटकारांची आतषबाजी करीत असताना भारतीय फलंदाज २० चौकार आणि ३ षटकारच मारु शकले.

स्कोअरबोर्ड:
पाकिस्तान ‘अ’ ८ बाद ३५२ (सैम अयुब ५९ – ५१ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकार, शाहबझादा फरहान ६५ – ६२ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकार, ओमर युसूफ ३५, तय्यब ताहीर १०८ – ७१ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकार, मुबासिर खान ३५, मोहम्मद वसीम नाबाद १७, राजवर्धन हंगर्गेकर ६-०-४८-२, रियान पराग ४-०-२४-२) वि. वि. भारत ‘अ’ ४० षटकांत सर्व बाद २२४ (साई सुदर्शन २९ – २८ चेंडूंत ४ चौकार, अभिषेक शर्मा ६१ – ५१ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकार, यश धुल ३९ – ४१ चेंडूंत ४ चौकार, सुफियान मुकीम १०-०-६६-३, अर्शद इक्बाल ७-०-३४-२, मोहम्मद वसीम ६-०-२६-२).


यश धुल, भारत अ संघाचा कर्णधार

पाक संघाने चांगली सुरुवात केली. आम्ही त्यांच्या फलंदाजांवर अंकुश राखला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी मोठी धावसंख्या रचली. आमचे फलंदाज खराब फटके मारून बाद झाले. आमचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्यच होता. या स्पर्धेचा अनुभव आमच्यासाठी मोलाचा आहे.



[ad_2]

Related posts