( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mangal Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 1 जुलैला सिंह प्रवेश केला आहे. क्रोध, धैर्य, निर्भयता, भूमीचा कारक मंगळ ग्रह 18 ऑगस्टला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही शुभ योग जुळून आले आहेत. 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता सिंह राशी सोडून मंगळ कुंभ राशीत गोचर करणार आहे. (trigrahi rajyog and neech bhang created mars moon venus 5 zodiac sign get money till 18 august Mangal gochar astrology)
मंगळाच्या संक्रमणामुळे नीचभंग, मत्स्य आणि विष्णु योग तयार होतो आहे. 16 ऑगस्ट 2023 पर्यंत शनीची दृष्टी मंगळ आणि राहूवर असणार आहे. याचा परिणाम राशींवर दिसणार आहे. दुसरीकडे चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असताना, सिंह राशीमध्ये चंद्र, शुक्र आणि मंगळ यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होतो आहे. याचा परिणाम काही राशींना प्रचंड धनलाभ होणार आहे.
मेष (Aries)
मंगळ गोचरमुळे नोकरी, व्यवसायिकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. उत्पन्नात वाढणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे. सिंह राशीत शुक्र, मंगळ आणि चंद्र यांचा बनलेला त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग गवसणार आहेत. नोकरीची नवीन ऑफर येणार आहे.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यकारक ठरणार आहे. धनवृद्धीसोबत अनेक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुम्हाला यश मिळणार आहे. शत्रूवर मात करु शकणार आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होणार आहे. बिझनेसमध्ये फायदा होणार आहे. हा योग तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. डिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ होणार आहे.
धनु (Sagittarius)
त्रिग्रही योगामुळे धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. धन संपत्तीशी संबंधित प्रश्न मिटणार आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. नवीन कार किंवा घरं खरेदी करण्याचे योग आहेत. तुम्हाला या काळात मोठा लाभ होणार आहे.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ ठरणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत काळ अतिशय भाग्यवान ठरणार आहेत. परदेशातील प्रवास लाभदायक ठरणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहेत. मानसिक शांतता लाभणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. करिअरमध्ये प्रगती लाभणार आहे. कामानिमित्त प्रवास घडणार आहे.
सिंह (Leo)
सिंह राशीसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा ठरणार आहे. तुमची सर्व कामं मार्गी लागणार आहेत. घर वाहन खरेदीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात मात्र अशांतता निर्माण होऊ शकतो. या लोकांना त्रिग्रही योगामुळे नशिबाची साथ मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळणार आहे. घरातून आनंदाची बातमी मिळणार आहे. आरोग्य सुधारणार आहे.