मुंबईकरांना 'नवीन एसी लोकल'साठी करावी लागेल आणखीन प्रतिक्षा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित झालेल्या वंदे मेट्रो उपनगरी वातानुकूलित रेल्वेगाडीतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने २३८ वातानुकूलित लोकलची बांधणी आणि देखभाल निविदा प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वंदे मेट्रो उपनगरी गाड्यांची बांधणी आणि देखभालीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील निविदा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे’, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर रविवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये साध्या लोकल धावत आहेत. ‘साध्या लोकलऐवजी वंदे मेट्रो लोकल सुरू करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. अहवाल आणि सूचनांचा समावेश निविदेच्या अटी-शर्तींमध्ये करण्यात येणार असल्याने तूर्त निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे’, असे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.


हेही वाचा

गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, जाणून घ्या टाईमटेबल

सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि मेट्रो-3 कॉरिडोर हायटेक सबवेने जोडला जाणार

[ad_2]

Related posts