Odi World Cup 2023 Wasim Jaffer Selecte 15 Member Team India For The World Cup Shikhar Dhawan Also Included

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wasim Jaffer 2023 ODI World Cup Team : पाच ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाच्या महासंग्रमाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा दावेदार म्हटले जातेय. भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रकही जारी करण्यात आलेय. दहा शहरांमध्ये 48 सामने होणार आहेत. आतापर्यंत विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय संघाची निवड झालेली नाही. त्यापूर्वी भाराताचा माजी सलामी फलंदाज वसीम जाफर याने 2023 वनडे वर्ल्ड कपसाठी भारताच्या 15 खेळाडूंची निवड केली आहे. या संघामध्ये जाफरने अनुभवी शिखर धवनला स्थान दिलेय. त्याशिवाय युजवेंद्र चहल याला संघात स्थान दिले नाही. राखीव विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन याला संधी दिली आहे. 

जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान, वसीम जाफरने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला  15 सदस्यीय भारतीय संघ निवडला. यामध्ये त्याने तीन सलामीवीरांना स्थान दिले. यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि शुभमन गिल यांना निवडलेय. जाफर म्हणाला, “माझ्याकडे तीन सलामीवीर असतील. शिखर धवनची निवड होणार नसली तरी, मी त्याला माझ्या संघात बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवेन.”

तो पुढे मधल्या फळीमधील फलंदाज आणि फिरकीपटूबद्दल म्हणाला की, “विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल यात कोणतीही शंका नाही. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर माझे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असतील.”

माझ्या विश्वचषकाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह असेल, आणि शमी आणि सिराज यांच्यापैकी एक असेल. मी सिराज आणि बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांची निवड करेन. माझ्यासाठी हार्दिक पांड्याने गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे, कारण विश्वचषक भारतात आहे आणि माझ्या इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू असतील. कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल. अक्षर पटेल आणि जाडेजा यांच्यामुळे फलंदाजी अधीक मजबूत होईल, असे जाफर म्हणाला.

2023 वनडे वर्ल्ड कपसाठी वसीम जाफरने निवडला भारतीय संघ  – 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर) आणि शार्दुल ठाकुर.

[ad_2]

Related posts