Sri Sri Ravi Shankar Shared Belly Fat Burn And Weight Loss Secret And Told How To Eat; वजन कमी करण्यासाठी काय खावे, श्री श्री रवि शंकर यांनी शेअर केले वेट लॉस सिक्रेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वजन न वाढण्याचे सिक्रेट

वजन न वाढण्याचे सिक्रेट

पनीर, नट्स आणि डाळ याच्या सेवनाने कधीही वजन वाढत नाही. वजन न वाढण्याचे हे सिक्रेट आहे. कार्ब्सपेक्षा प्रोटीनचे आहारात अधिक सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे आहारातून कार्ब्स आणि स्टार्च असणारे पदार्थ खाऊ नयेत. अधिक वेळा जेवणामध्ये बटाटा वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी बटाट्यासारखे पदार्थांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.

अ‍ॅसिडिक अन्नाचे संतुलन

अ‍ॅसिडिक अन्नाचे संतुलन

आपण जे जेवण जेवतो ते अत्यंत अ‍ॅसिडिक असते असं श्री श्री रवी शंकर सांगतात. मात्र हे अ‍ॅसिडिक अन्न संतुलित करण्यासाठी अल्कलाईन पदार्थ खायला हवेत. यासाठी तुम्ही अल्कलाईन पाण्याचाही वापर करून घेऊ शकता असंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळे चांगले अन्नपचन होण्यास मदत होते.

(वाचा – बद्धकोष्ठतेची समस्या होईल १ दिवसात गायब, ३ चमत्कारी उपाय आणि पोटातील घाण होईल छुमंतर)

अल्कलाईन पाण्याचे सेवन

अल्कलाईन पाण्याचे सेवन

दिवसभरात अल्कलाईन पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटावरील चरबी वितळविण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. एका जगात पाणी भरून घ्या आणि त्यात काकडीचे आणि लिंबाचे तुकडे रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटातील घाण स्वच्छ होते आणि चरबी जळण्यास मदत मिळते.

(वाचा – ६० व्या वर्षीही दिसाल तरूण आणि आकर्षक, आरोग्यासाठी करा फक्त ही २ कामं)

पाणी कधी प्यावे

पाणी कधी प्यावे

सकाळी उठून उपाशीपोटी पाणी प्या आणि जेवणानंतर साधारण २ तासाने पाणी प्यावे. ज्यामुळे वजन कमी करण्याचा फायदा मिळतो. जेवल्यावर त्वरीत पाणी पिण्याने अन्नाचे पचन नीट होत नाही. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे घास जेवताना हळू चावावेत जेणेकरून घास लागत नाही आणि पाणी पिण्याची इच्छा होत नाही. जेवल्यानंतर साधारण १-२ तासाने पाणी पिणे योग्य ठरते.

(वाचा – परफेक्ट फिगरसाठी मसाबा गुप्ता खाते या पदार्थाचं धिरडं, जाणून जबरदस्त फायदे)

अधिक लठ्ठपणा असल्यास

अधिक लठ्ठपणा असल्यास

श्री श्री रविशंकर यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्याचा लठ्ठपणा अधिक असेल तर त्याने प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ हे नेहमी वेगवेगळे खावे. जेणेकरून वजन कमी होण्यास मदत मिळेल.

दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास, वजन वाढ होतच राहील. दुपारी जेवणात चपाती खाल्ली तर रात्री जेवणामध्ये आमटी खावी. चपाती भाजीचे सेवन दुपारी करावे अथवा आमटी भात दुपारी खाल्ल्यास रात्री हलके फुलके आणि भाजीचे सेवन करावे.

डाळ चपातीसह खाऊ नये

डाळ चपातीसह खाऊ नये

भात आणि चपातीसह आमटी खाऊ नये. डाळी आणि नट्स हे प्रोटीनचा सोर्स असून नेहमी वेगळे खावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते आणि वजनवाढ होत नाही. आपले डाएट व्यवस्थित आखून घ्यावे असंही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले आहे. पनीर आणि नट्सदेखीस वेगवेगळे खावे. म्हणजे वजनवाढ होणार नाही.

[ad_2]

Related posts