Former Rashtriya Swayamsevak Sangh Minister Madandas Devi Passed Away

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madandas Devi Death : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandas Devi Death) अनंतात विलीन झाले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मदनदास देवी यांचं 81 व्या वर्षी बंगळुरुत निधन झालं. काल 24 जुलैला प्रकृती अत्यावस्थ असल्याने आणि वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव मोतीबागेतील कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अमित शाह अन् अन्य राजकारण्यांनी घेतलं अंत्यदर्शन

काल रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आलं होतं. आज सकाळपासून अनेक स्वयंसेवकांनी मोतीबागेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यासोबतच देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीही देवी याचं अंत्यदर्शन घेतलं सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतलं. 

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. ‘श्री. मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या या प्रसंगी ईश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. ओम शांति!’, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. 

मदनदास देवी यांचा अल्प परिचय

मदनदास देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. त्यांचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आहे. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1956 मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे मोठे बंधूही आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांचा संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. ते 1969 पासून संघ प्रचारक होते

हेही वाचा-

संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन

[ad_2]

Related posts