Kolhapur Swimmer Riya Patil Won Gold With Record New Delhi Cerebral Palsy Sports Competation Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cerebral Palsy Sports Federation of India : कोल्हापूरची जलतरणपटू रिया पाटीलने (Riya Patil) स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या CPSFI (Cerebral Palsy Sports Federation of India) स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. दिल्लीच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत रिया पाटीलने ही विक्रमी कामगिरी केली आहे. ही स्पर्धा केंद्रीय क्रीडा आणि युवक मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावून चॅम्पियन ट्रॉफीचा खिताब पटकावला.

नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या नॅशनल सेरेब्रल पाल्सी स्विमिंग चॅम्पियनशिप (National Cerebral Palsy Swimming Championship) स्पर्धेत 16 वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या रिया पाटीलने (Kolhapur Riya Patil) 50 मी बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक तसेच दोन रौप्यपदकं पटकावली. या स्पर्धेत 10 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 

Kolhapur Riya Patil Swimming Record :  रिया पाटीलने मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम

या आधी गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत रिया पाटीलने 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनिटे 57 सेकंदाची कामगिरी नोंदवली होती. तर 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 12 सेकंदाची कामगिरी नोंदवली होती. आता तिने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडत 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनीट 47 सेकंद तर 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 5 सेकंदाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे रियाची ही कामगिरी सर्वच सेलेब्रल पाल्सी मुलांसाठी आदर्श अशीच आहे. 

गेल्या वर्षी गुवाहाटी (Guwahati) येथे झालेल्या स्पर्धेत रिया पाटीलने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला होता. तसेच त्या स्पर्धेत रिया पाटील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली होती. 

रिया पाटील ही कोल्हापूरच्या सागर पाटील जलतरण तलाव या ठिकाणी सराव करते. तिला महाराष्ट्र पॅरा असोशिएशनचे (Maharashtra Para Association) चेअरमन राजाराम घाग, प्रशिक्षक अमर पाटील, फिटनेस कोच काशिनाथ भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. 

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हा विकार शारीरिक हालचालींशी संबंधित असून यात स्नायूची शक्ती, त्याचे नियमन आणि स्नायूंच्या अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला झालेल्या हानीमुळे होतात. 

संबंधित बातमी : 

 

[ad_2]

Related posts