Mumbai rain update imd issued red alert to mumbai on 27 july thursday imd predicted heavy rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला बुधवारी रात्री 8 ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (Red alert) इशारा दिला आहे. 

मुंबईकरांनी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे. 

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून गुरुवारी ऑरेंज अलर्ट आहे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू राहतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तर, ठाण्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. 

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी (Mumbai Rains) लावली. आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

बुधवारी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबईकरांच्या मनात 26 जुलै 2005 च्या आठवणी जाग्या झाल्या.

मुसळधार पावसातही सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई लोकल ट्रेन वाहतूक सुरळीत सुरू होती. तर, काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. हवामान विभागाने मुंबईसाठी आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts