Water Park Slide Accident Girls Having Fun On slide Men hit so hard on Back;VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून वेगात आलेल्याचा इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Water Park Accident: वॉटर पार्क हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. वॉटर पार्कमध्ये गेल्यावर पाण्यात मजा मस्ती करणे, स्लाइडमध्ये खेळणे, म्युझिकवर बेभान होऊन डान्स करणे हे प्रत्येकाला आवडते. पण हीच मस्ती करताना थोडेही दुर्लक्ष झाले तर आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो, याची जाणिव देखील असणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये वॉटर पार्कच्या स्लाइटमध्ये 2 तरुणी मस्ती करताना दिसतायत. पण पुढे एक मोठी दुर्घटना त्यांची वाट पाहतेय हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं.

देशातील अनेक मुख्य शहरांमध्ये वॉटर पार्क झाले आहेत. त्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेड्या वाकड्या स्लाइड्स असतात. विकेंडच्या दिवशी वॉटरपार्कमध्ये जाऊन मज्जा मस्ती करण्याला अनेकजण पसंती देतात. पण यावेळी काळजी घेणेदेखील तितकेच महत्वाचे असते. कारण यातील काही अनुभव जितते मजेशीर असतात तितके भीतीदायकही असतात.अशाच एका राइड दरम्यान दोन मुलींचा अपघात झाला. या अपघातात एका मुलीच्या पाठीचे हाड मोडले, तर दुसऱ्या मुलीलाही दुखापत झाली.

<

strong>स्लाइटच्या मध्यभागी अडकल्या 

वॉटर पार्कच्या स्लाइडमध्ये पाण्याचा प्रवाह सतत चालू राहणे आवश्यक असते. पण तसे न झाल्यास काय होऊ शकते? याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मुली राईडच्या मधोमध अडकलेल्या दिसत आहेत. 

स्लाइडवर पाणी सुरु राहिल्यास घसरलेली व्यक्ती अगदी सहजतेने खाली जाते. पण आजकाल अनेक वॉटर पार्क उघडले आहेत, जिथे देखभालीच्या नावाखाली काहीच होत नाही. 

अशाच एका वॉटरपार्कमध्ये या दोन मुली गेल्या होत्या. पाण्याचा प्रवास सुरु नसल्याने दोघीही स्लाइडच्या मध्यभागी अडकल्या. त्या उभ्या राहून मागे जाऊ शकत नव्हत्या. दोघींना खाली देखील जाता येत नव्हते. त्यामुळे मज्जा मस्ती करतानादेखील थोडासा ताण त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. पण काही वेळातच त्यांच्यासोबत विचित्र काहीतरी होणार होते. 

सहसा कोणत्याही वॉटरपार्क स्लाइडमध्ये, वरुन आलेली आधीची व्यक्ती पाण्यात पडते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला सोडले जाते. यावर लक्ष ठेवण्यासाठी स्लाइडच्यावर एक व्यक्ती तैनात असते. या व्यक्तीने इशारा केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला खाली जाऊ दिले जाते. पण या व्हिडीओमध्ये तसं घडताना दिसत नाही. स्लाईडवर दोन मुली अडकल्या होत्या. पण त्यांच्या मागून एक तिसरा मुलगा सरकत आला. त्याचा वेग इतका होता की त्याने दोन्ही मुलींना ढकलले. यामध्ये एका तरुणीच्या कंबरेला जोरदार मार लागल्याचे दिसत आहे.

या अपघातात तिघेही जखमी झाले. अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वॉटर पार्कमध्ये जाण्याची भीती वाटू लागली आहे. यात अनेकजण वॉटरपार्कच्या प्रशासनाला दोष देत आहेत. 

Related posts