Smriti Mandhana Palash Muchhal dating rumors sparks as Director choses Sangli for Rajpal Yadav starrer movie Kaam Chalu Hai shoot; सिनेमा राजपाल यादवचा, चर्चा स्मृती मानधनाची; दिग्दर्शक ‘प्रियकरा’ने शूटिंगसाठी सांगलीच निवडलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सांगली : प्रख्यात विनोदी अभिनेता राजपाल यादव ‘काम चालू है’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सांगलीत या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. राजपालने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर करत या विषयी माहिती दिली. मात्र चर्चा झाली ती फोटोत दिसणारी मराठमोळी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची.

‘काम चालू है’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संगीतकार पलाश मुच्छल याच्या खांद्यावर आहे. पलाश हा प्रख्यात गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पण पलाश आणि स्मृती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात दोघांनीही यावर भाष्य करणं टाळलेलं असलं, तरी सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांची जोडी जुळवली आहे.

‘काम चालू है’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन २७ वर्षीय पलाश मुच्छल करत आहे. स्मृती आणि पलाश एकमेकांचे खास मित्र आहेतच. मात्र काही काळापासून ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्याही चर्चा आहेत. दोघं एकमेकांसोबत असंख्य फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमण आहे तरी कोण ? फोटो शेअर करत सांगितली गुड न्यूज…
पलक मुच्छलने गेल्या वर्षी संगीतकार मिथून शर्मासोबत लग्न केलं. यावेळी रिसेप्शनला स्मृती मानधनाची उपस्थिती चर्चेचा विषय होती. आता ‘काम चालू है’ चित्रपटाचे शूटिंगही स्मृतीच्या सांगली जिल्ह्यात होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.


विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी पलाशने वाढदिवसाला आपल्या हातावर ‘SM 18’ अशी इंग्रजी अक्षरे टॅटू केली आहेत. ‘१८’ हा स्मृतीच्या जर्सीचा नंबर असल्यामुळे दोघं डेटिंग करत चर्चांना ऊत आले होते.


स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची उपकप्तान आणि सलामीची फलंदाज आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने सर्वाधिक बोली लावत स्मृतीला संघात घेतलं होतं. स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.

पाणी देऊ नका, नाहीतर… छातीदुखीने बेशुद्ध प्रवाशाला जीवदान, शिकाऊ नर्सनी सांगितला प्रसंग
दरम्यान, राजपाल यादवच्या आगामी काम चालू है सिनेमाच्या पोस्टरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरची लक्षवेधी गोष्टी म्हणजे या पोस्टवर सांगली स्टेशनचा बोर्ड पाहायला मिळत आहे, तर राजपालही मराठमोळ्या लूकमध्ये दिसतोय. पांढऱ्या रंगाचा कुर्ता -पायजमा तसंच डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या राजपालचा लूक व्हायरल झालाय.

धावा काढण्याची अजब टेक्निक; ह्या टॅलेंटला तोडच नाही



[ad_2]

Related posts