Why Mohammed Siraj Ruled Out From IND Vs WI Odi Series Bcci Told Reason In Detail

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mohammed Siraj ruled out of West Indies ODI Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय. आघाडीचा वेगवान गोलंदाज मायदेशी परतला आहे. बीसीसीआयने मोहम्मद सिराज याला वनडे मालिकेतून रिलिज केलेय. मोहम्मद सिराज याचा घोटा दुखत असल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेय. त्याशिवाय आशिया चषक आणि विश्वचषकामुळे सिराजला आराम मिळण्यासाठीही त्याला रिलिज करण्यात आलेय. मोहम्मद सिराज याचे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी बीसीसीआयने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. बीसीसीआयने सिराजची रिप्लोसमेंट केलेली नाही. त्यामुळे मुकेश कुमार याचे वनडेमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे.  

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद सिराज याने पहिल्या वनडेपूर्वी घोट्याच्या दुखण्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला वनडे मालिकेतून आराम देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या बदलीची घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सोडण्यात आले आहे. सिराजला घोट्यात दुखत असून खबरदारी म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सिराजला मायदेशी पाठवण्यात आलेय, मात्र बदली खेळाडू निवडण्यात आलेला नाही. 

सिराजच्या अनुपस्थितीत गोलंदाज कोण कोण ?

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल मुख्य स्पिनरच्या भूमिकेत असतील. रविंद्र जडेजा या जोडीला चांगली साथ देईल. भारतीय संघाच तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश असू शकतो.  यामध्ये शार्दुल ठाकूर, उमरान मलिक आणि मुकेश दिसू शकतात.  त्याशिवाय जयदेव उनादकट याचाही पर्याय असू शकतो.

भारतीय संघ कसा आहे… 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार. 

वनडे मालिकेचं वेळापत्रक – 

पहिला वनडे- 27 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस

दुसरा वनडे- 29 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस

तिसरा वनडे- 1 ऑगस्ट- ब्रायन लारा क्रिकेट एकेडमी, त्रिनिदाद. 



[ad_2]

Related posts