Sri Sri Ravi Shankar Shared How To Reduce Type 2 Diabetes And Food To Eat In 90 Minutes; टाइप – २ डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले ९० मिनिट्समध्ये काय खावे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोषणयुक्त आहाराची गरज

पोषणयुक्त आहाराची गरज

जीवनशैली बदलली आहे आणि अनेक जण आहारात भाजीऐवजी अन्य पदार्थच जास्त खातात. मात्र आहारात भाजीचा अधिक समावेश करून घ्यायला हवा. विभिन्न स्वरूपात फळं आणि भाज्यांचा समावेश असेल असा पोषणयुक्त आहार असावा असं गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. धान्याला ३०-४०% महत्त्व द्यावे. आहारात स्टार्चचे प्रमाण कमी केल्याने टाइप – २ मधुमेह लवकर बरा होण्यास मदत मिळते असंही त्यांनी सांगितले आहे.

आयुर्वेदाचे पालन करणे आवश्यक

आयुर्वेदाचे पालन करणे आवश्यक

प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये योग्य आहार पद्धती सांगण्यात आल्या आहेत आणि याचे पालन केल्यास टाइप – २ डायबिटीस नियंत्रणात नक्कीच राहू शकतो. आहारात भाजीचा कमी समावेश अथवा भातावर चमचाभर तूप घालून खाणे यामुळे एका गंभीर कार्बमध्ये परावर्तन होते ज्यामुळे भात पचत नाही आणि त्याचे रक्तातील साखरेत परावर्तन लवकर होते. त्यामुळे खाताना योग्य पद्धतीने खाणे अत्यंत गरजेचे आहे.

(वाचा – पिवळ्या दातांसाठी वापरा बेकिंग सोडा, हिऱ्यापेक्षाही चमकतील दात जाणून घ्या घरगुती उपाय)

९० मिनिट्समध्ये खाणे खावे

९० मिनिट्समध्ये खाणे खावे

श्री श्री रविशंकर यांच्या सांगण्याप्रमाणे शरीरामध्ये जे इन्सुलिन निर्माण होते ते ९० मिनिट्सच्या आत आपल्याला हवे ते दीड तासात खाऊन घ्यावे. सकाळी आणि रात्री दीड तासाच्या आत तुम्ही योग्य आहार घेतला आणि हे नियमित केल्यास तुमच्या शरीराचे वजन आणि डायबिटीस दोन्ही आटोक्यात येण्यास मदत मिळते.

तुम्ही हा नियम स्वतःला लावा आणि किमान दीड महिना हा प्रयोग करून पाहिल्यास, मधुमेह आटोक्यात येऊन वजनही कमी होईल असे स्वामींनी सांगितले आहे. सतत खात राहिल्यास, शरीरही गडबडते आणि इन्सुलिन नक्की कधी रिलीज करायचे आहे हे कळत नाही. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी ही वाढते आणि डायबिटीस नियंत्रणात येत नाही.

(वाचा – सकाळी उपाशीपोटी प्या हा चहा आणि पावसाळ्यात ठेवा सर्व आजारांना दूर, डायबिटीस रूग्णांसाठी वरदान)

तणाव करावा कमी

तणाव करावा कमी

तणाव आणि मधुमेह हे एकमेकांंचे जोडीदार आहेत. कोर्टिसोल हार्मोनचा अधिक प्रभाव वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळीही वाढते. यालाच स्ट्रेस डायबिटीस अर्थात टाइप – २ डायबिटीस असंही म्हणतात. तणाव हे टाइप – २ डायबिटीस निर्माण करण्याचे हे प्रमुख कारण आहे.

यासाठी तुम्ही सुदर्शन क्रियासारखा योगाभ्यास नियमित करावा आणि अनुलोम – विलोम करत श्वासावर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया शिकून घ्यावी. जेणेकरून तणाव कमी होण्यास आणि पर्यायी टाइप – २ डायबिटीस कमी होण्यास मदत मिळते.

(वाचा – कोथिंबीरच्या पाण्याचे कमाल फायदे, वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती वाढविण्यापर्यंत ठरते चमत्कारी)

इन्सुलिनचे नियंत्रण करण्यासाठी

इन्सुलिनचे नियंत्रण करण्यासाठी

योगामुळे इन्सुलिनचेही नियंत्रण होते आणि टाइप – २ डायबिटीस आटोक्यात येण्यास मदत मिळते. आपण दिवसभर डेस्कवर बसून कामं करतो आणि त्यामुळे मान, खांदा आणि मांड्यावरील तणाव अधिक वाढतो. योगामुळे अनेक लाभ मिळतात. इन्सुलिनच्या निर्माणाप्रमाणे टाइप – २ डायबिटीसचा स्तर वाढत असतो. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे हे योग्य आहार आणि योगावर अवलंबून आहे असं श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केले.

[ad_2]

Related posts