NIA Arrest Doctor From Pune In Maharashtra ISIS Module Case Taltal Arrest Go Upto 5

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune NIA News : एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. इसिसच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित अनेक दस्तऐवज यासारख्या अनेक दोषी साहित्य जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे. 

पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकून डॉ. अदनानली सरकार (43) याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कोंढव्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केले आहेत. हे डॉक्टर पुण्यातील तरुणांना प्रेरित करून आणि संघटनेमध्ये भरती करत असल्याचं समोर आलं आहे. 

एनआयएच्या तपासानुसार, सरकार देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पुण्यात इंजिनियरला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली होती. त्यानंतर ही पाचवी अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख,अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

 

 

 



[ad_2]

Related posts