Pen Ganpati City Loss Of Thousands Of Ganpati Idols In Pen Raigad Becouse Of Heavy Rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pen Ganpati city :  गणपती मूर्तींचं माहेर घर म्हणून रायगडच्या पेणची ओळख आहे. याच पेण शहरातील हमरापूर गावातील मुर्तीकारांवर अतिवृष्टीमुळे संकट आलं आहे. बाळगंगा नदीने पात्र सोडले आणि याचे पाणी तब्बल दीडशे कारखान्यांमध्ये शिरले, तर एका कारखान्याची भिंत कोसळूनही मूर्त्यांचं नुकसान झालं. सप्टेंबर महिन्यात ज्या मूर्त्यां घरोघरी विराजमान होणार होत्या. त्याच मूर्त्या माळावर ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं कारखानदारांना दीड कोटींचा फटका बसल्याचं जाणकार सांगतात. विघ्नहर्ता भक्तांवरील विघ्न दूर करतो, पण आज या विघ्नहर्त्याला साकारणाऱ्या हातांवर विघ्न आलं आहे. 

येत्या सप्टेंबर महिन्यात गणपती अनेकांच्या घरात विराजमान होणार आहे. याच गणेशोत्सवासाठीची तयारी पेणमध्ये सुरु झाली होती. पेणमध्ये सुमारे 400 कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये गणपतीच्या मुर्त्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र यातीलच सुमारे 150 कारखान्यांमध्ये बाळगंगा नदीला पूर आल्याने पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक मुर्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कारखान्यांमधील काही मूर्त्या वाहूनही गेल्या आहेत.

मुर्तीकारांचं आर्थिक नुकसान….

बाळगंगा नदीला पूर आल्याने 150 कारखान्या पाणी शिरलं. परिणामी यात अनेक मूर्त्यां वाहून गेल्या. प्रत्येक कारखान्यात शेकडो गणेश मूर्त्या तयार करण्यात आल्या होत्या. येत्या काहीच दिवसांत या मूर्त्यांवर रंग चढणार होते आणि या मूर्त्या महाराष्ट्रभर पाठवण्यात येणार होत्या. मात्र पावसामुळे मूर्तीकाराच्या हातची मेहनत वाया गेली आणि मुर्तीकारांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे.

सागर जाधव यांच्या कारखान्याची भिंत कोसळली

पेणचेच मूर्तीकार असलेले सागर जाधव यांच्या कारखान्याची भिंत कोसळली आहे. सागर हे मागील अनेक वर्षांपासून मुर्ती बनवण्याचं काम करतात. गणेशोत्सवासाठी राज्यभर त्यांच्या मूर्त्या खरेदी केल्या जातात. यंदाची त्यांच्या कारखान्यात शेकडो मूर्त्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र पावसामुळे कारखान्याची भिंत कोसळली आणि सागर यांची सगळी मेहनत पुराच्या पाण्यात वाहून गेली.

पेनला गणपती मूर्तींचं माहेरघर का म्हटलं जातं?

पेण शहरात राज्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवल्या जातात. यात शहरातील मूर्त्या महाराष्ट्रभरच नाही तर देशाबाहेर लंडनलादेखील पाठवल्या जातात. राज्यातील वेगवेगळ्या शहरातील व्यापारी पेणमध्ये येऊन साध्या मूर्त्या  घेऊन जातात आणि आपल्या शहरात जाऊन त्यावर रंगकाम करतात. ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जातं. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी पुढील वर्षांसाठी गणपती मुर्ती तयार करण्याचं काम पेणमधील मुर्तीकार करत असतात. त्यामुळेच पेणला मूर्तींचं माहेरघर म्हटलं जातं, असं वैभव ठाकूर सांगतात. 

हेही वाचा-

Maharashtra Rain Updates: मुंबईसोबतच राज्यातही दमदार पावसाची हजेरी; लांजात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवली

 

 

[ad_2]

Related posts