Openai-ceo-sam-altman-says-ai-tools-will-replace-humans-in-workspace Marathi News | ChatGPT Will Replace Humans : ChatGPT मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील का? AI च्या सीईओने दिला मोठा इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ChatGPT Will Replace Humans : सध्या सगळीकडेच चॅट जीपीटीची (ChatGPT) चर्चा होतेय. हे एक एआय (AI) टूल आहे ज्यामध्ये सर्व डेटा फीड केला गेला आहे आणि डेटाच्या आधारे ही मशीन सर्व काम माणसांपेक्षाही वेगाने करू शकते. जसे की, लेख, कविता, रिपोर्ट इ. गोष्टी अगदी सहज मिळवता येऊ शकतात. एआय टूल्स बाजारात आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे यामुळे लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात का? नुकतंच याबाबत ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ही चिंतेची बाब असू शकते का?

The Atlantic ला दिलेल्या मुलाखतीत सॅम ऑल्टमन (Sam Altman)  यांनी सांगितले की, अनेक लोक म्हणतायत की एआयचा प्रभाव चांगला असेल आणि त्याचा नोकरीवर परिणाम होणार नाही. मात्र, हे असत्य आहे. ते म्हणाले की AI आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि याचा अनेकांच्या नोकरीवरही परिणाम होणार आहे. सॅम यांनी सांगितले की त्यांची कंपनी चॅट GPT वरून एक पॉवरफुल एआय टूल देखील बनवू शकते. परंतु अजून लोक त्यासाठी तयार नाहीयेत. सीईओ सॅम पुढे म्हणाले की, आगामी काळात माणसांबरोबर एआय (AI) टूल्स देखील अस्तित्वात असतील जे सर्व काम करण्यास सक्षम असतील.

हे समजून घेतले पाहिजे 

कोलंबिया बिझनेस स्कूलचे प्राध्यापक ओडेड नेत्झर यांनी इनसाइडरला सांगितले की, लोकांना भीती वाटते की AI त्यांच्या नोकर्‍या काढून घेतील, परंतु सर्वात मोठा धोका हा आहे की जेव्हा एखाद्याला AI ची क्षमता पूर्णपणे समजेल आणि माहित असेल तेव्हा नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ, लोकांना AI चे संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. जर लोकांना AI बाबत पूर्ण माहिती असेल तर ज्यांना टेक्नॉलॉजीची पूर्ण कल्पना नाही अशा लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.  

मार्चमध्ये, गोल्डमन सॅक्सचा असा अंदाज होता की, जगभरातील 300 मिलियन नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होऊ शकतो. पण हा परिणाम AI मुळेच असेल असे नाही तर, AI ची जास्त समज असणारी व्यक्ती इतरांची नोकरी देखील गमावू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Data Security: तुमच्या फोनमधून ‘अशा’ प्रकारे लीक होतात वैयक्तिक गोष्टी; यापासून वाचण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

[ad_2]

Related posts