Food And Drug Administration One Lakh 50 Lakh Gutkha Panmasala Stock Seized Nashik Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Crime News : नाशिक शहरातील पंचवटीतील एका दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त (Gutkha Smuggling) केला आहे. नाशिक (Nashik) अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दुकानात, चारचाकी वाहनात आणि घरात साठविलेला सुमारे दीड कोटी रुपयांचा गुटखा आणि वाहनं जप्त करून दुकान सील केले. याप्रकरणी दुकान मालकाच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Nashik Food and Drug Administration action) करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये दीड कोटींचा गुटखा जप्त

प्रतिबंधित केलेला गुटखा (Gutkha) आणि तत्सम अन्न पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने छापासत्र सुरू केले आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय लोहकरे यांच्यासह पथकाने आडगाव परिसरातील खंडेराव मंदिरासमोरील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. यावेळी मालक प्रशांत कचरू सावळकर हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी पेढीची झडती घेतली असता 3 हजार 675 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा विक्रीसाठी आढळला. पेढीच्या समोर उभी असलेल्या गाडीची तपासणी केली असता त्यात 45 हजार 789 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

दुकान, घर आणि वाहनात गुटखा

दरम्यान, अधिकाऱ्यांचा संशय बळावला असता पथकाने सावळकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात एक कोटी 4 लाख 280 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आढळून आला. या साठ्यात हिरा पान मसाला, विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल 117 सुगंधित सुपारी, व्ही वन सुगंधित सुपारी, नखरेली स्वीट सुपारी असा एक कोटी 52 लाख 744 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर 30 लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. 

अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवाहन

नाशिकसह जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक आणि विक्री केल्याचे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts