Pune NIA News Nia Arrest Doctor From Pune Andan Ali In Maharashtra Isis Module Case Arrest Go Upto 5

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune NIA News : पुण्यातील कोंढवा भागात एनआयए  (NIA )आणि एटीएस(ATS) या दोन तपास यंत्रणांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये ISIS या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये पुण्यातील नामांकित हॉस्पिटल्समध्ये भूलतज्ञ म्हणून काम करणाऱ्या अदनान अली सरकार या डॉक्टरला अटक करण्यात आली. तर कोथरूडमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अब्दुल कादीर पठाणला एटीएस ने गोंदियातून अटक केली आहे. मात्र अटक केलेला डॉक्टर कोंढवा परिसरात राहत होता. यापूर्वी अटक केलेदेखील कोंढव्यातच राहत होते. त्यामुळे कोंढव्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

एनआयएने ISIS साठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मॉड्युल्सची पाळंमुळं खोदून काढायचं ठरवलं. मुंबईतून ताबिश नासिर सिद्दीकी, जुबेर नुरमोहम्मद शेख याला पुण्यातील कोंढव्यातून तर शार्जील शेखला ठाण्यातून तीन जुलैला अटक करण्यात आली. डॉ. अदनान अली सरकार कोंढव्यातील ज्या सोसायटीत राहतात त्याच्या अगदी जवळच नुरमोहम्मद शेख हा त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून डॉ. सरकार हे इसिससाठी काम करत असल्याचं समोर आलं. एनआयएने डॉ. सरकार यांना मुंबईला चौकशीला बोलावलं आणि त्याचवेळी पुण्यातील त्यांच्या घरी धाड टाकून इलेक्ट्रॉनिक गेजेट्स आणि इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणारं साहित्य जप्त केलं . 

एकीकडे एनआयएची ही कारवाई सुरु असताना एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युसूफ शेख या दोन दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अब्दुल कादीर पठाणला गोंदियातून अटक केली आहे . पठाण हा मागील 16 वर्षांपासून पुण्यातील कोंढवा भागात राहून ग्राफिक डिझाईनिंगचं काम करतो. कोंढव्यातील एका मशिदीत त्याची मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांच्यासोबत गाठ पडली होती . 

पुण्यातील कोथरूड भागात दोन कॉन्स्टेबल्सनी मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस यांना अटक करून त्यांच्या कोंढव्यातील घराची झडती घेतली होती. या झडतीत जप्त करण्यात आलेली पांढऱ्या रंगाची पावडर फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासासाठी पाठवण्यात आली होती. ती पावडर म्हणजे स्फोटकं असल्याचं आता स्पष्ट झालं. 

ISIS या संघटनेची इस्लामिक स्टेट ऑफ इराक एन्ड लेव्हेन्ट, इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया, इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ सुफा अशा वेगवगेळ्या उपसंघटना सध्या कार्यरत आहेत. इंटरनेटच्या साहाय्याने इसिसच्या विचारसरणीचा जगभर प्रचार करण्याचं काम या संघटनांकडून सुरू आहे. त्यांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याचं काम डॉक्टर अदनान अली  सरकार सारखे लोक करत होते. 

हेही बघा-

 

 

[ad_2]

Related posts