[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : रक्त पातळ करण्यासाठी रोज एस्पिरिनचा डोस घेणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक असू शकते. वृद्ध लोक स्ट्रोक टाळण्यासाठी हे औषध वापरतात. यामुळे स्ट्रोकचा धोका टाळता येतो किंवा कमी होतो असं मानलं जातं. मात्र, एका नव्या संशोधनात यासंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार, दररोज एस्पिरिन घेतल्याने मेंदूच्या ऊतींमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (JAMA) च्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.
अभ्यासात मिळालेल्या माहितीनुसार, संशोधकांनी १९, ११४ वृद्ध लोकांवर संशोधन केलं. या संशोधनात, संशोधकांनी एस्पिरिन घेत असलेल्या ९,५२५ लोकांचा आणि इतर औषधं घेत असलेल्या ९,५८९ लोकांचा अभ्यास केला. तब्बल ४.७ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर असं आढळून आलं की दोन्ही गटातील स्ट्रोकच्या घटनांमध्ये कोणतीही घट झाली नाही. उलट, आघातांशी संबंधित स्ट्रोक वाढल्याचे दिसून आले. संशोधकांना असे आढळून आले की जे लोक एस्पिरिन घेतात त्यांना मेंदूच्या नसांमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका ३८% वाढला होता.
एम्स दिल्लीतील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एमव्ही पद्मा श्रीवास्तव म्हणाले की, स्ट्रोक टाळण्यासाठी तुम्ही कमी डोसमध्ये एस्पिरिन देण्याचा धोका जास्त काळ घेऊ शकत नाही. या औषधाचे धोके आणि फायदे ओळखणं महत्त्वाचं आहे. विशेषतः वृद्धांमध्ये ज्यांना पडल्यामुळे डोक्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. ऍस्पिरिन हे अँटीप्लेटलेट एजंट आहे. हे रक्तवाहिन्यांमधील रक्त पातळ करण्यासाठी कमी डोसमध्ये वापरले जाते. JAMA अभ्यासानुसार, त्याच्या सतत वापराने रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. संशोधनात असं म्हटलं आहे की हे औषध प्राथमिक आणि दुय्यम स्ट्रोक रोखण्यासाठी प्रभावी आहे. पण त्याचा अनियंत्रित वापर चांगला नाही.
[ad_2]