Ben Stokes Leaves CSK Ahead Of The IPL 2023 Playoffs 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs GT, IPL 2023 Playoffs : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा सोळावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफसाठीचे चार संघ मिळाले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी चेन्नई संघाला मोठा झटका बसला आहे. चेन्नई संघातील स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

चेन्नईचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स इंग्लंडला परतला आहे. स्टोक्स इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे. बेन स्टोक्स आयपीएल सोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मायदेशी परतला आहे. इंग्लंडला 1 जूनपासून आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळायची आहे. यानंतर इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळणार आहे. त्यामुळेच स्टोक्स इंग्लंडला परतला आहे. चेन्नई (CSK) संघाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. प्लेऑफपूर्वी स्टार खेळाडूचं संघाबाहेर जाणं चेन्नई संघासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

चेन्नई संघ प्लेऑफमध्ये दाखल

चेन्नई सुपर किंग्स संघ दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करत प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई (CSK) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चमकदार कामगिरी केली. संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई संघाचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स मायदेशी परतला आहे. 

आयपीएल 2023 मधील बेन स्टोक्सचा प्रवास 

आयपीएल 2022 च्या मिनी लिलावात, चेन्नई सुपर किंग्स संघाने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्यांपासून बाहेर राहिला. या मोसमात बेन स्टोक्स फक्त दोन सामने खेळला. यामध्ये 2 डावात त्याला केवळ 15 धावा करता आल्या. तसेच, दोन सामन्यांमध्ये, त्याने 18 धावा देत फक्त एक षटक टाकलं.

चेन्नई अन् गुजरातमध्ये QUALIFIER 1 चा सामना

धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता चेन्नई आणि गुजरात या संघामध्ये क्वालिफायर एक (IPL 2023, Qualifier 1 CSK Vs GT) चा सामना होणार आहे. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चेन्नईने आतापर्यंत सर्वाधिक वेळा क्वालिफाय केलं आहे.  



[ad_2]

Related posts