Maharashtra Minister Deepak Kesarkar Advises Uddhav Thackeray And Praises Chief Minister Eknath Shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Deepak Kesarkar :उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना राग आहे. थोडंस दुर्लक्ष करून त्यांनी आता हे बोलणं थांबवलं पाहिजे. परत आम्ही काही बोललो तर त्यांना अपमानास्पद वाटतं. दुसरीकडे इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवेळी एकनाथ शिंदे डोंगर चढून गेले. ते प्रत्येक वेळी थोडी ना उत्तर देतील. एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात, त्यांना सलाईन लावावं लागतं, एका शिवसैनिकाचे कौतुक केले पाहिजे, असा सल्ला मंत्री दीपक केसरकर (deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

मंत्री दीपक केसरकर आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) बोलणं थांबविण्याचा सल्ला तर एकनाथ शिंदेच्या कामाचे कौतुक करण्याचे आवाहन केले. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना राग आहे. थोडंस दुर्लक्ष करून त्यांनी आता हे बोलणं थांबवलं पाहिजे. परत आम्ही काही बोललो तर त्यांना अपमानास्पद वाटतं. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) डोंगर चढून गेले. ते प्रत्येक वेळी थोडी ना उत्तर देतील. तसेच एकनाथ शिंदे रात्री उशिरा काम करतात, त्यांना सलाईन लावावं लागतं. कारण मिनिमम झोप माणसाला हवी असते ना, त्यामुळे एका शिवसैनिकाचे कौतुक करा. तसेच तुमचा अजेंडा काँग्रेसला सोबत घेणं असू शकतो. त्याला आमचा विरोध नसल्याचे केसरकर म्हणाले. 

तर नाशिक (Nashik Bribe) जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणात शिक्षण विभागातील (Education Department) अनेक अधिकाऱ्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिकच्या सुनीता धनगर यांना मोठी लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणावर दीपक केसरकर म्हणाले की, निलंबन झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सेवेत घ्यावे लागते. अनेक जणांच्या निलंबनाच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे. सावकाशपणे प्रत्येक क्षेत्रात बदल होईल. त्यामुळे आताच कुणाला काढणे हा उद्देश नाही, पण याला जरब बसली पाहिजे, असा इशारा केसरकर यांनी यावेळी दिला. जिथे जिथे तक्रारी होत्या, त्यांना साईड पोस्ट देण्यात आली असून तक्रारी खऱ्या आहे की नाही, हे बघावं लागतं. त्यानुसार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी आम्ही सुरू केल्याचे केसरकर म्हणाले. 

एका विरोधात शंभर कौरव एकत्र

नाशिक मुंबई मार्गावरील खड्ड्यांवर ते म्हणाले की, नाशिक-मुंबई रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाणी आणि डांबर याचं समीकरण कधी जुळत नाही. सध्या काँक्रीटीकरण हे ध्येय आहे. यामुळे खड्डे इतिहास जमा होतील. बांद्रा येथे जी पैसे खाणारी लोकं होती, ती देखील इतिहासजमा होतील, अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधली जात आहे. यावर केसरकर म्हणाले की, एका विरोधात शंभर कौरव एकत्र येत आहे. जे देशाच्या हिताचा विचार करत नाही, त्यांना कौरवच म्हणावे लागेल, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. 

कुणालाही अनुदान दिलं जाणार नाही… 

तसेच 10 ते 20 टक्के वाईट लोकं विभागाचे नाव खराब करतात. हळू हळू आम्ही सफाई करत असून आम्ही खाजगी शाळेला तीन चार महिन्यात परवानगी देतो. एक गुलाबाचे फुल आणि फाईल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली जाते. पण आता आम्ही योग्य असेसमेंट बघत आहोत. त्यामुळे यापुढे कुणालाही अनुदान दिलं जाणार नाही, कारण अनुदानाचा बोजा वाढत असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच शालेय शिक्षणात मुलांच्या पुस्तकाचे ओझं कमी झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, हे आमचे ध्येय आहे. त्यानुसार शिक्षक भरती आम्ही सुरू केली. ही भरती होणार, हे गृहीत धरून आम्ही जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. खासगी शाळा अधिकाधिक फी घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही समिती स्थापन केली. पण सरकारने कमीत कमी मध्यस्थी करायचे ठरवलं आहे. कारण नवीन शिक्षण प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

[ad_2]

Related posts